चांद्यापासून बांध्यापर्यंत राजकारणात आपल्या साधेपणाने आणि कामाच्या व्यासंगाने ओळखले जाणारे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा आज जन्मदिवस. राजकारणाचा वारसा ज्यांच्या घराण्याला आहे. अशा अनेकांचे नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिले. मात्र कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर राजकारणात उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आर आर आबा वेगळंच व्यक्तिमत्व होते (Aba of ordinary people! Due to these four decisions)
रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच सर्वांचे आर आर पाटील सांगली जिल्ह्यातल्या तासगावच्या अंजनी गावचे.. घरातली परिस्थिती तशी हलाखीची पण आबांनी लहानपणापासून कष्टाची कामं करत घराला हातभार लावला आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं.
कॉलेजमध्ये आपल्या वक्तृत्व कलेवर हातखंडा असणारे आबा पुढे राजकारणात वळले. जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असा लांबचा पल्ला त्यांनी गाठला. आबांनी त्यांच्या कारकीर्दीत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आपण या निमित्ताने जाणून घेऊ.
आर आर आबांनी आघाडी सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री असताना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवले. गावागावांमध्ये स्वच्छतेबद्दल प्रचार, प्रसार व्हावा यासाठी मेहनत घेणाऱ्या आबांचे सर्व स्तरावर कौतुक झाले.
आर आर पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात महात्मा गांधी तंटामुक्त अभियान हे तेव्हा एक अनोखे अभियान राबवले. गावागावांमध्ये वाद मिटले तर, सर्वांच्या सहकार्याने गावाच्या विकासाला गती मिळेल. ही त्या मागची दूरदृष्टी होती. आर आर आबांनी गृहमंत्री असताना पोलीस भरती मोठ्या प्रमाणात राबवली.
ज्यामुळे सामान्य कुटुंबातील तरुण मुलांना शासकीय नोकरी मिळण्याची आशा निर्माण झाली. त्यांनी घेतलेला डान्सबारवर बंदी हा मोठा निर्णय त्या काळात खूप गाजला. अशाप्रकारे सामान्यांचे हित जपणारे निर्णय आबांनी कायमच घेतले होते. आर आर पाटील आज नसले तरी त्यांची झलक ज्याच्या नेतृत्वात दिसते, असा त्यांचा मुलगा रोहित पाटील आबांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
Panchand meghwal : दलितांवर होणारे अत्याचार पाहून काँग्रेस आमदाराचे मन दुखावले, दिला राजीनामा
Gujrat riots : गुजरात दंगल: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची 15 ऑगस्टला सुटका
एक गट बारा भानगडींचा फुकट मॅटिनी शो बघायला काय हरकत आहे? सामनातुन शिवसेनेचा शिंदे गटाला टोला