चिन्मय मांडलेकर अभिनित ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट सध्या माध्यमात फारच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे, यामधील कलाकारांचे कौतुक होत असताना दुसरीकडे चित्रपटाला प्राईम-टाईम मिळत नसल्याच्या कारणावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे याबाबत आपली प्रतिक्रिया देत आहेत.
नुकतीच अभिनेता अक्षय वाघमारे याने इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत ‘शेर शिवराज’ चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचे सांगत याचा जाहिर निषेध केला होता. त्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्याने यासंदर्भात आपला राग व्यक्त केला आहे. हा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे.
आस्ताद काळेने त्याच्या फेसबुक हँडलवर चित्रपटाच्या स्क्रिनिंग टाईमचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यासोबत त्याने लिहिले की, ‘अजून किती वर्षं महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमधे मराठी चित्रपटांनाच योग्य स्थान मिळत नाही’ या गोष्टीचा त्रास सहन करायचाय??? किती वर्षं???’
https://www.facebook.com/aastadsunitapramod.kale/posts/4962975293824378
आस्तादची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहीजण मराठी चित्रपटांना प्राईम-टाईम मिळत नसल्याचे सांगत आहेत तर काहीजण तेवढ्याच ताकदीचे चित्रपट बनवल्यास लोक का बघणार नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
दरम्यान, ‘शेर शिवराज’ हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील चौथे पुष्प आहे. यापूर्वी त्यांच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिखस्त’, ‘पावनखिंड’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर आता ‘शेर शिवराज’ या चित्रपटाद्वारे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानचा केलेला वध आणि यासोबत इतिहासातील अनेक प्रसंग दाखवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
आई-वडिलांची अपेक्षा ऐकून भावूक झाले ‘लागिरं झालं जी’मधील समाधान मामा; म्हणाले, दुसऱ्याच्या आनंदात..
‘महाराष्ट्र दिनी’ महेश मांजरेकर करणार महाघोषणा; म्हणाले, ‘तुमचं लक्ष असुद्या, प्रतिक्रिया अत्यंत मोलाची’
“त्याला सांगा नीट राहायला, नाहीतर…”, शर्मिलांनी सांगितला राज ठाकरेंना दुबईहून आलेल्या धमकीच्या फोनचा किस्सा