90च्या दशकात आशिकी चित्रपटाने लोकांना वेडे करुन सोडले होते. या चित्रपटातील गाण्यांचे सर्वजणच दिवाणे झाले होते. चित्रपटातील गाण्यांना आणि कलाकारांना प्रेक्षकांनी तर डोक्यावर घेतले होते. मुख्य म्हणजे, या चित्रपटातून एका नवख्या चेहऱ्याने एंट्री मारली होती. या चेहऱ्याची ओळख पुढे जात सुप्रसिध्द अभिनेता अशी झाली.
अभिनेता दीपक तिजोरी यांनी आशिकी चित्रपटामध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत दीपक तिजोरी होते. दीपक यांचा आशिकी हा पहिलाच चित्रपट होता. यानंतर त्यांनी जिता वही सिकंदर, कभी हां कभी ना, अंजाम, गुलाम, आणि बादशाह सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.
बघता बघता दीपक तिजोरी सर्वांचे लाडके अभिनेते बनले. परंतु काही काळानंतर त्यांनी बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते कोणत्याच चित्रपटात दिसले नाही. मात्र आता दीपक तिजोरी बॉलिवूडमधून एक्झिट झाल्यानंतर त्यांच्या मुलीने सिनेसृष्टीत एन्ट्री मारली आहे.
दीपक तिजोरी यांच्या मुलीने म्हणजेच ‘समारा’ने बॉलिवूड विश्वात काम करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच तिने जॉन अब्राहमच्या ढिशुम या चित्रपटासाठी तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच तिने ग्रँड प्लॅन या चित्रपटात ही काम केले आहे. आपल्या अभिनयातून तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मात्र या सगळ्यात समारा ही दीपक तिजोरीची मुलगी आहे हे खास करुन कोणाला माहित नाही. सावळ्या रंगाची समारा सुंदर आणि खूपच हॉट आहे. सोशल मीडियावर समारा आपले हॉट फोटो नेहमी टाकत असते. तिच्या या फोटोंना लाखोंच्या घरात लाईक्स असतात.
समाराच्या सौंदर्यामुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत असतात. तरी देखील ति जास्त बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसत नाही. आता नुकताच समाराने एक प्रोजेक्ट हाती घेतला आहे. सध्या ति याच प्रोजेक्टच्या कामात व्यस्त आहे.
महत्वाच्या बातम्या
टाटाची इलेक्ट्रिक कार होणार लाँच, सिंगल चार्जमध्ये धावणार तब्बल ५९० किमी; किंमत आहे फक्त..
राहुल गांधींच्या विचारांचा पडला वेगळाच प्रभाव, वृद्ध महिलेने राहुल गांधींच्या नावावर केली ‘एवढ्या’ लाखांची संपत्ती
बाबो! बाईकवर समोर बसली होती पत्नी, मागे होत्या ३७ खुर्च्या, पाहून आनंद महिंद्राही झाले अवाक, म्हणाले..
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले ‘हे’ फोटो पाहून २२ कोटी श्रीलंकन नागरिक संतापले, दिल्या अशा प्रतिक्रिया