aarti deshmukh crying after seeing anil deshmukh | गेल्या वर्षभरापासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात होते. त्यांच्यावर १०० कोटी घोटाळ्यांचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दोन केंद्रीय तपास यंत्रणा अनिल देशमुखांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तपास करत होत्या.
अनिल देशमुखांचे वकील गेल्या वर्षभरापासून जामीन मिळवून देण्यासाठी धडपड करत होते. पण त्यांना जामीन मिळत नव्हता. अखेर बुधवारी अनिल देशमुखांना जामीन मिळाला आहे. यासाठी त्यांच्या कुटुंबियांना खुप प्रयत्न करावे लागले आहे.
गेल्या वर्षभरात अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. तुरुंगात असताना अनिल देशमुख आजारी सुद्धा पडले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची चर्चाही होती. अशात अखेर वर्षभरानंतर त्यांची सुटका झाली आहे.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपली पत्नी आरती देशमुख यांची भेट घेतली आहे. आपल्या पतीला पाहताच आरती देशमुखांचे अश्रू अनावर झाले होते. अनिल देशमुखांना पाहताच आरती देशमुख या ढसाढसा रडायला लागल्या.
https://twitter.com/MiniforIYC/status/1608104696874700804
अशात प्रसारमाध्यमे आरती देशमुख यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी धडपड करत होते. पण आरती देशमुख या प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यावेळी सगळ्या प्रसारमाध्यमांचे कॅमेरे आरती देशमुखांवरच होते.
गेल्या वर्षभरात इतक्या घटना घडल्या, इतक्या काही गोष्टी बघितल्या त्यानंतर आज अनिल देशमुखांची सुटका झाली आहे. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले पत्रकार आरती देशमुखांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होते. पण इतक्या दिवसानंतर अनिल देशमुखांना पाहून ते काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या.
महत्वाच्या बातम्या-
‘दारूचे व्यसन करू नका’ म्हणून केंद्रीय मंत्री करतोय विनवणी, देतोय स्वतःच्याच मुलाचे उदाहरण
raj thackeray : राज ठाकरेंचे ते जाहीर खडसावणारे पत्र वसंत मोरेंसाठी की संदीप देशपांडेंसाठी? अखेर पुण्यात उघड झाले गुपित
pankaj deshmukh : देशासाठी काय पण! मोठा मुलगा शहीद झाला असतानाही आईने दुसऱ्या मुलाला केलं सैन्यात भरती