AAP खासदार हरभजन सिंगने शेतकऱ्यांच्या मुलींसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा, लोकांकडून होतंय कौतुक

क्रिकेटच्या मैदानातून राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवणारा क्रिकेटपटू हरभजन सिंगने(Harbhajan Singh) एका उदात्त हेतूकडे पाऊल टाकले आहे. आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) खासदार हरभजन सिंग यांनी सांगितले की, राज्यसभेतून मिळणारा पगार मी शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी खर्च करणार आहे.(aap-mp-harbhajan-singh-made-a-big-announcement-for-the-daughters-of-farmers)

माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी शनिवारी सांगितले की, मी आपला राज्यसभेचा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी देणार आहे.

सिंह यांनी ट्विट केले की, ‘राज्यसभा सदस्य(Member of Rajya Sabha) या नात्याने मला माझ्या RS वेतनाचे योगदान शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी द्यायचे आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी माझ्या देशाच्या भल्यासाठी योगदान देण्यासाठी सामील झालो आहे आणि माझ्याकडून जे काही करता येईल ते करेन. जय हिंद.’

माजी क्रिकेटपटूची पंजाबमधून(Punjab) राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून ती प्रामाणिकपणे पार पाडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. उल्लेखनीय म्हणजे, आम आदमी पक्षाने या वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवार उभे केले होते. सर्वपक्षीय उमेदवार बिनविरोध निवडून आले.

पंजाबमधील विधानसभेच्या 117 पैकी 92 जागा जिंकून पक्षाने क्लीन स्वीप केला होता. दणदणीत विजय म्हणजे ‘आप’ला राज्यसभेच्या पाचही जागा मिळू शकतात.