Share

Aamir Khan: लाल सिंग चड्ढा प्लॉप झाल्यानंतर आमिरचे टेन्शन वाढले, डिस्ट्रीब्युटर्सने मागितली नुकसान भरपाई

नुकत्याच आलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून आमिर खान (Aamir Khan) हादरला आहे. आमिरच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. आमिरला ‘लाल सिंग चड्ढा’कडून खूप आशा होत्या आणि बॉक्स ऑफिसवर तो इतका खराबरित्या आपटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे बोलले जात आहे.

एका खाजगी वृत्तसंस्थेच्या वृत्तपत्रात आमिर खान आणि त्याची माजी पत्नी किरण राव यांच्या जवळच्या मित्राचा हवाला देऊन म्हटले आहे की, आमिरने ‘फॉरेस्ट गंप’ (टॉम क्रूझ अभिनीत 1994 चा हॉलीवूड चित्रपट) ची सर्वोत्कृष्ट आवृत्ती तयार करण्यासाठी कठोर परिश्रम केले, पण त्याला मिळालेल्या प्रतिसादाने तो खूप दुखावला आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

याच वृत्तात पुढे लिहिले आहे की, चित्रपटाच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या वितरकांनी (डिस्ट्रीब्यूटर्स) आमिर खानकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कारण त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. आमिर या चित्रपटाचा अभिनेता आणि सहनिर्माता असल्याने त्याने  त्याच्या अपयशाची जबाबदारी घेतली आहे. तो आता वितरकांचे नुकसान भरून काढण्यातही मग्न आहेत.

अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र याच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर याविरोधात बहिष्कार मोहीम सुरू होती, ज्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 11.50 कोटी रुपये कमावले आणि वीकेंडच्या अखेरीस (रविवारपर्यंत) चित्रपटाची कमाई केवळ 37 कोटींवर आली.

चित्रपटाचे बजेट 180 कोटी रुपये आहे आणि चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता निर्मात्यांना मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आमिर खान चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’मधून मोठ्या पडद्यावर परतला. त्याचा शेवटचा चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ 2018 मध्ये रिलीज झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

आमिरला आशा होती की, अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ त्याला यशस्वी पुनरागमन करून देऊ शकेल, पण त्याच्या आशा धुळीला मिळाल्या. आमिर खानचा आगामी चित्रपट स्पॅनिश चित्रपट ‘कॅम्पिओन्स’ रिमेक आहे आणि गुलशन कुमार यांचा बायोपिक ‘मुघल’ आहे.

महत्वाच्या बातम्या-
Aamir Khan : आमिर खान आहे १७९० कोटींचा मालक पण अजूनही या ४ स्टार्सच्या तुलनेत आहे गरीब
Aamir Khan :नेटकऱ्यांच्या त्या कृतीवर भडकला आमिर खान, आता नाही बनवणार महाभारत चित्रपट, म्हणाला
kangna ranaut:  म्हणून आमीर खानने स्वताच हा वाद सुरू केला, कंगना राणावतचा आमिर खानवर गंभीर आरोप

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now