राज ठाकरे(Raj Thackrey): बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे. त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती.
आमिर खानने वेळोवेळी प्रेक्षकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर खानला काय करावं हे सुचेनासे झाले आहे. या कठीण काळात आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
आमिर खान बुधवारी (ता. १७) दुपारी चार वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचला. आमिरने सुमारे तासभर शिवतीर्थवर राज ठाकरेंशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे जेव्हापासून शिवतीर्थवर राहायला गेले, तेव्हापासून विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांनी त्यांच्या नवीन घराला भेट दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही अनेक दिग्गजांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. प्रकृतीबाबत जाणून घेतले. त्यामुळे आमिर खानही राज ठाकरे यांच्या तब्येतीबाबत विचारपूस करायला तिथे गेला असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
आमिरचा चित्रपट फ्लॉप ठरल्याने तो सध्या अडचणीतून जात आहे. त्यामुळेच या भेटीबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाबाबतीत झालेल्या प्रोब्लेमच्या वेळीसुद्धा राज ठाकरेंनी मध्यस्थी केली होती. शाहरुख खान व रोहित शेट्टी यांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
जखमेवर मीठ टाकणारी आपण औलाद; उगाच पावसाचं नाव बदनाम करायचं; बच्चू कडू भडकले
अजितदादा विरोधातही फुल फाॅर्मात! पहील्याच प्रश्नात शिंदे सरकारची दांडी गूल
ठाकरेंजवळचा आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, उदय सामंतांच ‘ते’ वक्तव्य खरं ठरणार
ठाकरेंजवळचा आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, उदय सामंतांच ‘ते’ वक्तव्य खरं ठरणार