Share

करोडोंची संपत्ती, अलिशान आयु्ष्य तरी आमिर खानला वाटतेय ‘या’ गोष्टीची खंत; स्वतःच केला खुलासा

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केले. यामध्ये अशाच एका अभिनेत्याचा समावेश होतो. कोणतीही चित्रपटसृष्टीतील पार्श्वभूमी नसताना या अभिनेत्याने आपले स्थान निर्माण केले. इतकेच या चित्रपटसृष्टीने त्याला एक विशेष ओळख देखील मिळवून दिले आहे. तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान होय.

आमिर खानने सोमवार (१४ मार्च) आपला ५७ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सध्या आमिर यशाच्या शिखरावर आहे. असे असले तरी देखील त्याला एक गोष्टीची खंत नेहमी वाटते. याबद्दल त्याने आपले मत ही व्यक्त केले आहे. मात्र ती गोष्ट आता त्याला कधीही पूर्ण करता येणार नाही.

आमिर खानने नुकतेच एक मुलाखतीत सांगितले की, “कामामुळे मला माझ्या कुटुंबाला जास्त वेळ देता आला नाही. या सर्व कामात कुठेतरी मी माझी जबाबदारी पार पाडली नाही, असे मला वाटते. माझे आई-वडील, माझी भावंडे, रीना जी, माझी पहिली पत्नी, किरण जी, रीना जीचे आई-वडील, किरण जीचे आई-वडील, माझी मुलं हे सर्व लोक जे माझ्या खूप जवळचे आहेत.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “मी आता जे बोलत आहे ते वयाच्या 18 व्या वर्षापासूनचे आहे. जेव्हा मी चित्रपटांच्या दुनियेत आलो. तेव्हा मी इतका गुंतलो होतो. मला इतके शिकायचे होते की, मला काहीतरी करायचं होते. पण आज मला असं वाटतंय की, जे लोक माझ्या खूप जवळ होते त्यांना मी वेळ देऊ शकलो नाही.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “मी त्यांना ज्या प्रकारे वेळ द्यायला हवा होता. तो मी त्यांना देऊ शकलो नाही. जे अनेक अर्थाने खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही म्हणू शकता की, आतापर्यंत मी फक्त माझाच विचार करत होतो. बघा, जर कोणी म्हणत असेल की, मी माझ्या करिअरला सुरुवात करत आहे आणि मी रात्रंदिवस काम करतो. तर प्रत्येक माणसाला हे सर्व करावंच लागते.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “तुम्ही तुमचे करिअर सुरू करण्यासाठी २-४ वर्षे घालवले. जास्तीतजास्त ५ वर्षे तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही. कारण तुम्ही करिअरमध्ये खूप व्यस्त होता. मात्र जर तुम्ही हे ३० वर्षे हेच केले तर ते खूपच जास्त आहे.” अशा पद्धतीने आमिर खानने आपल्या जीवनातील सर्वात मोठी खंत व्यक्त केली.

आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, रीना दत्ताशी त्याने १९८६ मध्ये लग्न केले होते. त्यानंतर त्यांना जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुले आहेत. त्यानंतर २००२ मध्ये रीना आणि आमिर खानने घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने किरण रावशी लग्न केले. त्यानंतर त्यांना मुलगा आझाद राव खान आहे. या दोघांची भेट ‘लगान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तसेच आमिरचे हे लग्न देखील टिकले नाही. किरण राव आणि आमिर खानने २०२१ मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली होती.

तसेच त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य देखील प्रमुख भूमिकेत आहेत. हा एक कॉमेडी-ड्रामा मिक्स चित्रपट आहे. हा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.

 

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now