Share

झुंड चित्रपटासाठी पडद्यामागचा हिरो ठरला आमिर खान, बिग बींना काम करण्यासाठी केले राजी

बॉलीवूड इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने तुम्हाला काही सुचवले तर साहजिकच ते नाकारणे कठीण आहे. आमिर अनेकदा त्याच्या सहकलाकारांना आणि निर्मात्यांना सल्ले देत असतो. तुम्हाला माहित आहे का की मेगा स्टार अमिताभ बच्चन यांना आमिर खानने ‘झुंड’ चित्रपटासाठी राजी केले होते.(Aamir Khan persuaded Big B to work for the movie Zhund)

आज ‘झुंड’ चित्रपट चित्रपटगृहात (थिएटर) पोहोचला आहे. या चित्रपटाला क्रिटिक्सचे भरभरून प्रेम मिळत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाशी अमिताभ बच्चन यांचा संबंध याचाही एक रंजक किस्सा आहे.

वास्तविक, दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यातील कनेक्शन शक्य करणारा दुसरा कोणी नसून अभिनेता आमिर खान आहे. झुंड फ्लोअरवर जाण्यापूर्वी, आमिरने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आणि तो इतका प्रभावित झाला की त्याने बिग बींना चित्रपट करण्याचा सल्ला दिला आणि त्यांना चित्रपट करण्यासाठी तयार केले. दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी रुपेरी पडद्यावर जादू निर्माण करेल याची आमिरला खात्री होती.

अमिताभ बच्चन यांनीही आपल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे. बिग बी म्हणाले, मला आठवते की मी आमिरशी याबाबत चर्चा केली होती. तो मला म्हणाला की, मी हा चित्रपट करावा आणि आमिर जेव्हा एखाद्या गोष्टीला मान्यता देतो तेव्हा काय होते ते सर्वांनाच माहीत आहे.

नुकताच आमिर या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला गेला होता. चित्रपट पाहिल्यानंतर आमिर इतका भावूक झाला की त्याला अश्रू आवरले नाहीत. एका मुलाखतीदरम्यान आमिरने या चित्रपटाचे कौतुक करताना सांगितले की, हा एक अप्रतिम चित्रपट आहे. हे अविश्वसनीय आहे. हे खूप अनन्य आहे. संपल्यानंतरही हा चित्रपट माझी पाठ सोडत नाहीये.

अमीर पुढे म्हणाला की, माझ्याकडे शब्द नाहीत कारण हा एक अतिशय आश्चर्यकारक चित्रपट आहे. या इंडस्ट्रीत राहून 20-30 वर्षांत आपण जे काही शिकलो, ते सगळं तोडून टाकल. अमिताभ बच्चन यांनी जबरदस्त काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट चित्रपट केले आहेत परंतु हा त्याच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे.

महत्वाच्या बातम्या-
फेसबूकवर विदेशी महिलेशी मैत्री करणं भोवलं, लागला ८ लाखांना चुना; पोलिसांनी असा लावला छडा
उन्हाळ्यात पाण्यातूनच कमवा पाण्यासारखा पैसा; असा करा मिनरल वॉटरचा बिझनेस, कमवा करोडो
चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच झुंडच्या टीमचा जबरदस्त डान्स; नागराज मंजुळे यांनी स्वत: वाजवली हलगी

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now