बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता म्हटला जाणारा ‘आमिर खान’ त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आमिर खानच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आमिर खान सोशल मीडियापासून दूर राहतो, तर अभिनेता आणि समीक्षक कमाल रशीद खान(Kamal Rashid Khan) ट्विटरवर खूप सक्रिय असतो आणि अनेकदा त्याच्या ट्विटमुळे चर्चेत असतो. दरम्यान, नुकतेच केआरकेने आमिर खानला टोमणे मारणारे ट्विट केले आहे.(aamir-khan-is-a-true-patriot-he-left-his-wife-but-did-not-leave-the-country-the-actor-scoffed)
केआरके अनेकदा ट्विटरवर स्टार्सची खिल्ली उडवतो. अशा परिस्थितीत त्यांनी यावेळी आमिर खानची खिल्ली उडवत लिहिले की, ‘आमिर खान(Aamir Khan)ने आपण खरा देशभक्त असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांची पत्नी म्हणाली होती की, ‘देशात भीती आहे. देश सोडून द्या. भावाने पत्नीला सोडले, पण देश सोडला नाही.’
त्याच्या ट्विटमध्ये केआरकेने हसणारा इमोजीही टाकला आहे. केआरकेच्या या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जण त्याला कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात कमेंट करू नका असे सांगत आहेत, तर काहीजण कमेंट सेक्शनमध्ये आमिरला ट्रोल करत आहेत.
आमिर खान ने साबित कर दिया है, कि वो सच्चा देशभक्त है!
उसकी बीवी ने बोला था, कि देश में डर लगता है! देश छोड़ दो!
भाई ने बीवी छोड़ दी, लेकिन देश नहीं छोड़ा😜— KRK (@kamaalrkhan) March 22, 2022
अलीकडेच आमिर खान विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्स(The Kashmir Files)वरील प्रतिक्रियेमुळे चर्चेत होता. आरआरआरच्या पत्रकार परिषदेदरम्यान आमिर खानने सांगितले की, त्याने काश्मीर फाइल्स पाहिली नाहीत, पण लवकरच पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच त्यांनी असेही म्हटले आहे की, ‘हा आपल्या इतिहासाशी संबंधित असा किस्सा आहे, ज्याने सर्वांचे मन दुखावले आहे.’
आपले म्हणणे पुढे चालू ठेवत आमिर म्हणाला, ‘काश्मिरी पंडितांबाबत जे काही झाले ते दुःखद आहे. प्रत्येक भारतीयाने पाहावा असा हा चित्रपट आहे. अत्याचार होतात तेव्हा कसे वाटते हे प्रत्येक भारतीयाने पाहिले पाहिजे.’
3 जुलै 2021 रोजी आमिर आणि किरणने एका पोस्टद्वारे ते वेगळे झाल्याची माहिती दिली होती. किरण राव(Kiran Rao) आणि आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. किरणच्या आधी आमिरचे लग्न रीना दत्ताशी झाले होते. लग्नाच्या 16 वर्षानंतर 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. रीना दत्तासोबत आमिरची मुलगी इरा आणि मुलगा जुनैद आहे.