बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) सध्या कठिण काळातून जात आहे. आयराने नुकतीच सोशल मीडियाद्वारे सांगितले की, तिला अँग्झायटीचा (तणाव) सामना करावा लागत आहे. अँग्झायटीमुळे तिला कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, याबाबतही तिने सांगितले आहे.
आयराने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने लिहिले की, ‘मला आता अँग्झायटी (चिंता) अटॅक येत आहेत. यामुळे मला खूप भीती वाटते आणि मी भावूक होते. तसेच मला फिट्ससुद्धा येत राहतात. पण मला यापूर्वी कधीच अँग्झायटी अटॅक आला नव्हता. हा अटॅक पॅनिक आणि पॅनिक अटॅकच्या मधील आहे. अँग्झायटी विरूद्ध अँग्झायटी’.
‘अँग्झायटीबद्दल मला जेवढे माहित आहे त्यानुसार याचे काही शारीरिक लक्षणे आहेत. जसे की, श्वासोच्छवास वाढणे, धाप लागणे, रडणे, त्यानंतर ते हळूहळू अधिकच वाढत जाणे असे. मग तेव्हा वाटते की, काहीतरी भयानक होत आहे. मला हे सर्व शारिरीक लक्षणे जाणवतात. पण मला माहित नाही की पॅनिक अटॅक म्हणजे नेमकं काय असतं’.
आयराने पुढे लिहिले की, ‘ही खरोखरच विचित्र भावना आहे. माझ्या मानसोपचारतज्ञांनी सांगितले की, जर हे नियमित होत असेल (मागे मला दोन महिन्यात एकदा किंवा दोनदा अशी लक्षणे जाणवली. पण आता जवळपास रोजच असे वाटत आहे) तर याबाबत डॉक्टर किंवा त्यांना सांगावे’.
‘जर कोणाला असे लक्षणे जाणवत असेल आणि त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज पडत असेल तर त्यांना हे उपयोगी पडेल. खरंच यामुळे खूप असहाय्य वाटत असतं. मला खरोखरच झोपायचं असतं पण या त्रासामुळे मी अजिबात झोपू शकत नाही. मी माझ्या या भीतीला ओळखण्याचे प्रयत्न करत असते. स्वतःशी बोलते. पण जेव्हा तुम्हाला अँग्झायटी येतो तेव्हा तो थांबण्याचं नावच घेत नाही’.
‘पण तुम्हाला स्वतःला यामधून बाहेर काढण्याची गरज आहे. आणि तेच मी शोधून काढले आहे. पण या अँग्झायटीची सुरुवात होत असतानाच Popeye शी बोलणे आणि ब्रीदींग यामुळे मला अँग्झायटीचा अटॅक न होण्यापासून मदत मिळाली. कमीत कमी काही तासांसाठी तरी. तसेच त्यानंतर जर मी दुसऱ्या कोणत्या कारणामुळे तणावग्रस्त झाल्यास ते त्यावरही अवलंबून असते’.
आयराने शेवटी लिहिले की, ‘आयुष्य अनेक बदलांनी भरलेले आहे. जर तुम्ही सजग राहण्याचा प्रयत्न करत असाल तर या सर्व गोष्टी विचारात घ्या. तिथेच थांबा’. दरम्यान आयराने तळटीप देताना सांगितले की, या पोस्टसोबत तिने शेअर केलेला तिचा फोटो तिला अँग्झायटी अटॅक आल्यामुळे शॉवर घेतल्यानंतरचा आहे’.
दरम्यान, आयरा मानसिक आरोग्याबद्दल नेहमी तिचे मत मांडत असते. मागील वर्षीही तिने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले होते की, ती मागील ५ वर्षापासून ती क्लिनीकल डिप्रेशन (नैराश्य) चा सामना करत आहे. यामध्ये एक व्यक्ती अनेक दिवस उदास राहतो आणि स्वतःला एकाकी समजत असतो.
महत्त्वाच्या बातम्या :
सेक्स हे कॅलरीज बर्न करण्यासाठी..; आयुष्मान खुरानाच्या पत्नीने सेक्स लाईफबद्दल केला मोठा खुलासा
शाहरूख खान आणि हिरानींच्या ‘डंकी’च्या सेटवरचा पहिला फोटो आला समोर, असा असेल नजारा
‘अंगात छत्रपती शिवाजी महाराज आले पाहीजे; हीच खरी मराठेशाही ठरेल’