Share

‘माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीयेत’, ‘झुंड’ चित्रपट पाहून आमिर खानचे डोळे पाणावले, पहा व्हिडीओ

Nagraj Manjule

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित ‘झुंड’ (Aamir Khan About Jhund) हा चित्रपट शुक्रवारी (४ मार्च) सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि ‘सैराट’ जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने हा चित्रपट पाहून चित्रपटाचे आणि नागराज मंजुळे यांचे भरभरून कौतुक केले आहे.

नागराज मंजुळे यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आमिर खान ‘झुंड’ चित्रपट पाहून चित्रपटाचे कौतुक करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यानचा आहे. आमिर खानसाठी हे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी ‘झुंड’ चित्रपटातील सर्व कलाकारांसोबत नागराज मंजुळे आणि टी-सीरीजचे भूषण कुमारही उपस्थित होते.

या स्पेशल स्क्रिनिंगवेळी चित्रपट संपल्यानंतर सर्वांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर व्हिडिओत आमिर म्हणत आहे की, ‘पहिल्यांदाच एका खासगी स्पेशल स्क्रिनिंगला सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवल्याची घटना घडली आहे. माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. चित्रपटातील मुलामुलींच्या भावनांना ज्याप्रमाणे पडद्यावर दाखवलंय, ते अविश्वसनीय आहे. तसेच सर्व मुलांनीही काय काम केलं आहे. हा चित्रपट मनं जिंकण्यासोबत सर्वांना एक प्रेरणासुद्धा देते. चित्रपटाचे कौतुक करावं तितकं कमी आहे’.

आमिर खान पुढे नागराज मंजुळे यांचं कौतुक करत म्हणाला, ‘आम्ही चित्रपटात २०-३० वर्षात जे काही शिकलो त्याचं फुटबॉल करून टाकलंय नागराज मंजुळेने. खूपच अद्भुत चित्रपट आहे. आणि अमिताभ बच्चन सरांनीही काय कमालीचं काम केलं आहे. त्यांच्या करिअरमधील हा सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे, असे म्हणत आमिर खानने ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक केले आहे.

https://www.facebook.com/1704772843/videos/447494537110846/

या स्पेशन स्क्रिनिंगवेळी आमिरने चित्रपटातील सर्व कलाकारांसोबतही संवाद साधला. तसेच सर्व मुलांना त्याने त्याच्या घरी येण्याचे प्रेमाचे निमंत्रणही दिले. याशिवाय या स्क्रिनिंगवेळी ‘सैराट’ चित्रपटातील परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरही उपस्थित होता. तर आकाशचेही आमिरने यावेळी कौतुक केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिलावहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे ते हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट समाजसेवक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय बरसे हे एक निवृत्त क्रिडा शिक्षक होते. त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग दिली होती. तसेच त्यांनी स्लम सॉकर नावाच्या एनजीओचीही स्थापना केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
113 मिनिटांच्या ‘या’ चित्रपटात आहे फक्त एकच अभिनेता; गिनीज बुकमध्येही आहे नोंद
VIDEO: ‘देवमाणूस’मध्ये मोठा ट्विस्ट, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अजितकुमारसोबत घडणार ‘ही’ घटना
माझा बाप कोण आहे माहितीय का? अशी धमकी देणारांनो मिझोरममधील हे फोटो एकदा पहाच…

 

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now