Share

आम आदमी पार्टीचा मोठा निर्णय; ‘त्या’ शेतकऱ्यांना एकरी ४५ हजार रूपये नुकसानभरपाई देणार

Bhawant Mann

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल गुरुवारी हाती आले. अन् या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. तर कॉंग्रेसला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर तिकडे पंजाबमध्ये मात्र भाजपला पराभव सहन करावा लागला आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेस, भाजप, अकाली दल या सर्वांना धुळ चारत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनीदेखील 45 हजारांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर, कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिद्दूसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला आहे.

काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांचा तर त्यांच्या दोन्ही मतदार संघात पराभव झाला आहे. आज पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांचा शपथविधी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यासाठी खटकर कलानमधील तब्बल १५० एकरांवरील गव्हाचे भुईसपाट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या सोहळ्यासाठी तब्बल २ लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तसेच यासाठीच्या मंडपाचा आकार १३ एकरांवरुन तब्बल १५० एकरांवर नेण्यात आला असल्याचे समजत आहे. या १५० एकरांवरील जवळपास २० शेतकऱ्यांना ४५ हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे या नुकसानाची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी मान यांची निवड झाली. त्यानंतर शनिवारी त्यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेवून सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी हा दावा स्विकारला असून आज दुपारी १२:३० वाजता खटकर कलान या भगतसिंग यांच्या मूळ गावी त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
गुजरात निवडणुकीत केला जाऊ शकतो भाजपचा पराभव; राहुल गांधींनी आखला मास्टर प्लॅन
मारूतीच्या celerio ने ग्राहकांच्या मनात केले घर, देते तब्बल ३५ किमीचे मायलेज, किंमत आहे फक्त..
‘पतीच्या रक्ताने माखलेला भात जबरदस्तीने पत्नीला खाऊ घातला’, काश्मिरी पंडितांचा किस्सा वाचून काळीज फाटेल
प्रभासचा राधे श्याम चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्याने घेतला गळफास, धक्कादायक कारण आले समोर

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now