Share

भोंगा वादात ‘आप’ची उडी! भोंगे-हनुमान चालिसाला ‘या’ गीताने देणार सडेतोड उत्तर, राजकारण तापणार?

raj

सध्या राज्यामध्ये हनुमान चालीसा (Hanuman Chalis) व भोंगा यावरून मोठा वाद सुरू आहे. आजच्या पत्रकार परिषदेत देखील राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे म्हणतात, ‘देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा,३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे.’

भोंगा वादावरून शिवसेना – मनसे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या वादावर थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता भोंगा वादात आप’ने उडी घेतली आहे.

त्यामुळे भोंगा वाद आणखी चिघळणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. याबाबत आपचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी माहिती दिली आहे. ते याबाबत कल्याण डोंबिवलीत आपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. तसेच या मेळाव्यात शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

‘सर्वच भोंग्यांचा निषेध करत सर्व जाती धर्मांना एकत्र आणून राष्ट्रीय सलोखा निर्माण करणारे राष्ट्रगीत ‘आप’कडून चौकाचौकात वाजवले जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. तसेच या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे प्रभारी दीपक सिंगल, गोव्याचे माजी उधोगमंत्री महादेव नाईक, प्रदेश सचिव धनंजय शिंदे देखील उपस्थित होते.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ‘2016 मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोणत्याही एका धर्माबद्दल न बोलता सर्व धार्मिक स्थळावरील धवनिक्षेपकाच्या आवाजाला 75 डेसीबलची मर्यादा घालून दिली आहे. मात्र, मनसे बेरोजगार तरुणांचा बुद्धिभेद करत असल्याचा आरोप आप’ने केला.

तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील मंदिरात सकाळी आरतीसाठी भोंगे लावले जातात. मात्र, महागाईने हवालदिल झालेल्या समाजात आपापसात फूट पाडून त्यांना जगण्याच्या प्रश्नापासून दूर करण्याची भाजपासह इतर राजकीय पक्षाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now