स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी (Milind Gawali) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत असतात. यामध्ये कधी ते त्यांच्या सहकलाकारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यांच्यासोबतचे किस्से सांगत असतात. तर कधी त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो शेअर करत असतात. यादरम्यान आज मातृदिनाच्या निमित्ताने मिलिंद गवळी त्यांच्या आईच्या आठवणीत भावूक होत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या आईच्या अनेक फोटोंचा कोलाज करून एक व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत लिहिले की, ‘प्रत्येक दिवस हा मातृदिन असतो. माझ्या आईचा जन्म झाला नव्हता तर तिने २१ जून १९४६ रोजी पृथ्वी या ग्रहाला भेट दिली होती. इतरांना मदत करण्यासाठी, इतरांची सेवा करण्यासाठी आणि सर्वांना प्रेम वाटण्यासाठी. तिने आम्हाला निस्वार्थ प्रेम म्हणजे काय असतं हे शिकवलं आणि ती २ मार्च २००९ रोजी हा पृथ्वी ग्रह सोडून निघून गेली.
मिलिंद यांनी पुढे लिहिले की, ‘तिने तिचे संपूर्ण आयुष्य लोकांची मदत करण्यात घालवली. तिचे संपूर्ण आयुष्य इतरांसाठी जगली. तिने खूप आनंदी आणि उत्साहपूर्ण जीवन जगले. ती नेहमी म्हणत असत की, आपल्याला जीवन एकदाच मिळते. त्यामुळे याचा पूरेपूर फायदा घ्या. इतरांबद्दल कधी द्वेष बाळगू नका आणि कधी इतरांबद्दल वाईट इच्छू नका. नेहमी आनंदी आणि उत्साहाने राहा’.
मिलिंद गवळी पुढे म्हणाले की, ‘मी नेहमीच एक खोडकर मुलगा होतो. मला या पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक व्यक्तीसोबत समस्या असायची. तेव्हा माझ्या आईने मला एक साधू आणि विंचूची गोष्ट सांगितली. गोष्ट अशी की, एके दिवशी एक साधू नदीजवळून जात होते. तेव्हा त्यांना एक विंचू बुडताना दिसला. तेव्हा त्यांनी त्या विंचूला बाहेर येण्यासाठी मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यावेळी तो विंचू त्यांना चावू लागला. परंतु तरीही त्या साधूंनी त्या विंचूला बाहेर येण्यास मदत करतच राहिले’.
‘त्यादरम्यान एक वाटसरू तेथून जाताना ते दृश्य पाहिले आणि साधूंना विचारले की, ‘तो विंचू तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करत आहे. पण तरीही तुम्ही का त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत आहात?’ यावर साधूंनी उत्तर दिले की, ‘एवढा लहान प्राणी आपला स्वभाव आणि चावण्याची नैसर्गिक कृती सोडत नाही तर मग मी इतरांना मदत करण्याचा माझा स्वभाव का सोडू? तो त्याचे काम करत आहे आणि मी माझे काम करत आहे’.
मिलिंद यांनी शेवटी म्हटले की, ‘माझ्या आईने हे जीवन आनंदी, उत्साही आणि इतरांसाठी जगण्यासाठी अशा अनेक शिकवणी आणि अतुलनीय अशी सुंदर आठवणी सोडून गेली. आज संपूर्ण जग मातृदिन साजरा करत आहे. तर आपण सर्वजण प्रत्येक दिवस मातृदिन साजरा करूया. कारण प्रत्येक आई निस्वार्थ प्रेमाची हक्कदार आहे’.
महत्त्वाच्या बातम्या :
प्रसिद्ध गायिकेवर झाला सामूहिक बलात्काराचा प्रयत्न, म्हणाली, मला गाण्यासाठी बोलावलं आणि…
लॉकअपचा विजेता मुन्नवर फारुकीचे आयुष्य होते वादग्रस्त, कधी रडला तर कधी हसला
VIDEO: तरुणाने छेड काढल्याचा व्हिडिओ अभिनेत्रीने स्वत:च केला शेअर; पोलिस म्हणाले…