स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ मालिकेत अरूंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभूलकर. मालिकेतील आपल्या सहजसुंदर अभिनयाने मधुराणी यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. अरूंधती या पात्राद्वारे त्यांनी प्रेक्षकांकडून कौतुक मिळवत त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात मधुराणी यांना अरूंधती या नावानेच ओळखले जाते.
मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीत असण्यासोबतच मधुराणी सोशल मीडियाद्वारेही नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असतात. याद्वारे त्या अनेक पोस्ट शेअर करत असतात. सोबतच त्या त्यांची मुलगी स्वरालीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओसुद्धा चाहत्यांशी शेअर करत असतात. नुकतीच मधुराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर मुलीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मधुराणी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत त्या मुलगी स्वरालीसोबत ‘बडे अच्छे लगते है’ हे गाणं गाताना दिसून येत आहेत. मायलेकीची या गाण्यावरील जुगलबंदी चाहत्यांनाही खूपच आवडला आहे. त्यामुळे ते या व्हिडिओवर भरभरून लाईकचा वर्षाव करत आहेत. तसेच त्यावर अनेक कमेंट करत मधुराणी आणि त्यांच्या मुलीचे कौतुक करत आहेत.
मधुराणी यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केली होती. त्यांनी स्वतः लिहिलेले आणि त्यांचीच निर्मिती असलेले नाटक ‘सी-सॉ’ ला सर्वोत्तम नाटकाचा ‘पुरुषोत्तम करंडक’ पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘इंद्रधनुष्य’ या मालिकेत काम केले.
त्याच साली त्यांनी ‘गोडगुपित’ या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आणि याच बरोबर ‘तुमचं आमचं सेम असतं’ आणि ‘नवरा माझा नवसाचा’ या मराठी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका निभावली. याशिवाय मधुराणी यांनी २००८ मध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘सा रे म’ या शोमध्ये सहभाग घेऊन आपले गायन कौशल्य दाखवले होते.
एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच मधुराणी एक उत्तम गायिका, संगीत दिग्दर्शिका आणि निवेदिकासुद्धा आहेत. याशिवाय त्या पती प्रमोद प्रभुलकर यांच्यासोबत एक अॅक्टिंग अकॅडमीसुद्धा चालवतात. ‘मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी’ असे त्याचे नाव आहे.
‘मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी’मधून आजपर्यंत अनेक उत्तम कलाकार समोर आले आहेत ज्यांनी मालिका क्षेत्रात खूप लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये निखिल चव्हाण (कारभारी लयभारी), शिवानी बावकर (लागिरं झालं जी), गिरीजा प्रभू ( सुख म्हणजे नक्की काय असतं?), ह्रता दुर्गुळे (फुलपाखरू), किरण गायकवाड (देवमाणूस) यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्रीची निर्घूणपणे हत्या; गोणीत आढळला मृतदेह
सई ताम्हणकर बॉयफ्रेंडसोबत गेली होती मुव्ही पाहायला, ‘त्या’ फोटोने झाला मोठा खुलासा
अवॉर्ड शोमध्ये अपमान सहन न झाल्याने शो सोडून तडक निघाली ‘शक्तिमान’मधील गीता; पहा व्हिडिओ