स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ (Aai Kuthe Kay Karte?) ही मालिका छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. मालिकेत अरूंधतीला मुलीप्रमाणे प्रेम देणारे अप्पा तर सर्वांचे लाडके आहेत. तर मालिकेत अप्पा ही भूमिका साकारणारे अभिनेते किशोर महाबोले यांच्या मुलीचं नुकतंच लग्न पार पडलं. तर या लग्नातला किशोर यांचं त्यांच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अप्पा अर्थात किशोर महाबोले यांच्या मुलीचे नाव सृष्टी असे आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी तिचा थाटात विवाहसोहळा पार पडला. या लग्नादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत किशोर आणि सृष्टी या बापलेकीचं खास बॉन्डिंग दिसून येत आहे.
सृष्टी गिरमे नावाच्या मेकओव्हर आर्टिस्टने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, किशोर यांची मुलगी सृष्टीने लग्नासाठी पारंपारिक काठापदराची साडी नेसली आहे. तसेच तिच्या डोक्यावर मुंडावळ्यासुद्धा बांधलेल्या दिसत आहेत. तर मुलीच्या लग्नासाठी किशोर यांनी खास शेरवानी घातल्याचे दिसून येत आहे.
आपल्या लाडक्या मुलीला नववधूच्या रूपात पाहून किशोर यांचा चेहरा आनंदाने खुलल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तसेच किशोर आणि त्यांची मुलगी दोघेही यावेळी कॅमेऱ्याला पोझ देताना दिसून येत आहेत. तर बापलेकीचा हा गोड व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत अप्पा आणि त्यांच्या मुलीचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, किशोर महाबोले मराठी आणि हिंदीतील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी हिंदीतील पवित्र रिश्ता या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्यांनी अर्चना म्हणजेच अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडिल मनोहर ही भूमिका साकारली होती. तर सध्या आई कुठे काय करते या मालिकेतील त्यांची अप्पा ही भूमिका प्रेक्षकांना फारच आवडत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
काश्मिरी पंडितांवर बनलेला चित्रपटाच्या टीमने घेतली मोदींची भेट; चित्रपटाचे कौतूक करत मोदी म्हणाले…
“द काश्मिर फाईल्स’ पाहून ढसाढसा रडली महिला, थेट पकडले दिग्दर्शकाचे पाय; म्हणाली…
‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी विवेक अग्निहोत्रींकडे मागितले ‘एवढे’ रूपये, प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा