शिवसेनेत उभी फुट पडल्यापासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकेकाळी एकमेकांच्या सोबत काम करणारे आता एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं.
या सर्व राजकीय घडामोडींमद्धे आता चर्चेत आलेला विषय म्हणजे, दरवर्षीचा दसरा मेळावा..! शिवसेनेमध्ये दोन गट स्थापन झाल्यामुळे यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण आयोजित करणार असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट (Eknath shinde and Uddhav Thackeray) आता दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आले आहेत.
अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटाकडून मुंबई महानगरपालिकेकडे दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज पाठवला आहे. तर काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटाने यापूर्वीच पालिकेला अर्ज दिला होता. आता शिंदे गटानेही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितल्याने मोठा पेच उभा राहिला आहे.
याचाच धागा पकडत आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे की, दसरा मेळावा हा शिवसेनेचाच आहे. काहीजण मुखवटे घालून फिरत आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे बंडखोरांना लक्ष केलं आहे.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेतून अनेक लोक बाहेर पडले. पण इतका निर्लज्जपणा कोणीही दाखवला नव्हता.’ सुरुवातीला आमच्यावर प्रेम आहे, आमच्याविषयी आदर आहे, असा मुखवटा त्यांनी घातला होता, असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, ‘खोटा मुखवटा आता फाटला आहे. दुसरा मुखवटा म्हणजे शिवसेना आमचीच आहे, या दाव्याचा. मात्र लवकरच हा मुखवटाही फाटेल. याचे कारण असे की, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने उभी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. गेल्या दिवसांपासून आदित्य ठाकरे हे शिंदे गटाला चांगलेच धारेवर धरताना पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण थेट दिल्ली दरबारी; कॉंग्रेसच्या गोटात खळबळ, राजकीय समीकरण बदलणा
धक्कादायक ! दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू प्यायल्याने मृत्यू; खळबळजनक घटनेने जिल्हा हादरला
शिवसेनेनंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ, शिंदे सरकारच्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस नेत्यांची वर्णी
Politics: भाजप मनसेची युती होणार? मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शहा घेणार राज ठाकरेंची भेट?