राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवार पासून तीन दिवस कोकण दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांच्या कोकण दौऱ्याचा दूसरा दिवस आहे. अनेक कारणांनी आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा चर्चेत आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नाणारमधील रिफायनरी राजापूर तालुक्यात अन्य ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरु असताना आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये ठिकठिकाणी प्रकल्पाविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामुळे या दौऱ्याला पुन्हा एकदा राजकीय वळण मिळाले असल्याचे दिसतं आहे.
या दौऱ्यातील अतिशय आनंदाची बाब म्हणजे तब्बल सात वर्षानंतर या दौऱ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे थेट मामाच्या गावी पोहोचले. देवगड येथील दाभोळे या गावी पाटथर वाडीत आदित्य ठाकरे यांचे मामा प्रकाश पाटणकर राहतात. प्रकाश पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे चुलत बंधू आहेत.
तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत आदित्य ठाकरे यांनी नातेवाईकांची ख्याली खुशाली विचारली. मनसोक्त गप्पा मारल्या. सोबतच देवाला गाऱ्हाणं घातलं. याचबरोबर झोपाळ्यावर बसून त्यांनी शहाळं घेतलं. यावेळी प्रकाश पाटणकर यांनी त्यांना घराच्या कलमाच्या आंब्यांची पेटी भेट दिली.
दरम्यान, आदित्य ठाकरे बराचवेळ मामाच्या घरी होते. त्यानंतर ते पुढील दौऱ्याला निघाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर आदी नेते उपस्थित होते. तसेच आदित्य ठाकरे यांना कोकण दौऱ्यातील ही गोष्ट खरच खूप आनंद देणारी होती.
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांत राणे कुटुंब विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद सुरु असताना आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे. आदित्य ठाकरे यावेळी भाजपा नेते नितेश राणेंच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. तसंच देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
भयानक! मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन नाचणाऱ्या तरुणासोबत घडला भयानक प्रकार, गाव हादरलं
मुलीला छेडणाऱ्या तरूणाचे मुलीच्या बापाने तुकडे तुकडे करून नदीत फेकले; वाचा कुठे घडली ही भयंकर घटना…
महाराष्ट्रात वीज संकटाची समस्या तीव्र; येत्या 48 तासांत या ठिकाणची बत्ती होणार गूल
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको, आणि काॅंग्रेस मात्र…