स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. त्यानंतर काही दिवसात किरण माने यांना त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. आपण ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं गेलं, असा आरोप किरण माने यांनी केला.
त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच यामुळे मालिकेच्या निर्मात्यांवर राज्यभरातून टीका केली जात आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना शोच्या निर्मात्यांनी किरण माने यांनी इतर कलाकारांना त्रास दिला म्हणून त्यांना काढण्यात आले असा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी अनेक राजकीय नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.
दरम्यान, आता शिवसेनेनेही किरण माने यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत शिवसेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर म्हणाले, ‘किरण माने यांना मोठं व्हायचं आहे म्हणून ते असा वाद निर्माण करत आहेत. हा सगळा वेडेपणा आहे,’ असे म्हणत त्यांनी माने यांच्या भूमिकेला विरोध केला आहे.
तसेच या प्रकरणावर मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही. किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला आहे. योग्य वेळी याबाबत आम्ही भूमिका घेऊ, असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.
मला यावर काही बोलायचं नाही. किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिला आहे. त्यांच्या वर्तवणूकीमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. ते म्हणताय की राजकीय भूमिकेमुळे त्यांना अचानक काढण्यात आलं. यावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. त्यांना त्यांच्या वर्तवणूकीमुळेच काढले आहे. या सगळ्यात योग्यवेळी मनसे आपली भूमिका घेईल, असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, किरण माने यांनी स्टार प्रवाह वाहिनीवर आणि शोच्या निर्मात्यांवर आरोप केला होता. किरण म्हणाले होते की, त्यांनी राजकीय भूमिका असलेली पोस्ट केली, त्यामुळे त्यांना अचानक मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर रविवारी आज स्टार प्रवाह वाहिनीने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने यासंदर्भात परिपत्रक जारी करत म्हटले आहे की, किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. तसेच असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. माने यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय मालिकेमधील अनेक कलाकारांसह, विशेषतः महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! प्रसिद्ध कथ्थक सम्राट बिरजू महाराजांचे निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
कोहलीच्या राजीनाम्यानंतर जय शहांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया ; ३ वाक्यांत संपवला विषय
धक्कादायक! प्रसिद्ध कथ्थक सम्राट बिरजू महाराजांचे निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
राज्यात पुन्हा शाळा कधी सुरू होणार? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची बातमी