लोकनेते म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तर या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. सध्या या टीझरची सर्वत्र चर्चा आहे.
यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी या टीझरबाबत आपली प्रतिक्रिया दिली. यासोबतच त्यांनी आनंद दिघेंसोबतचा त्यांचा एक किस्सा सांगितला. आदेश बांदेकर यांनी म्हटले की, ‘माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी मंथन नावाचे कार्यक्रम करायचो. त्यावेळी अजित गायकवाड हे या कार्यक्रमाचे निर्माते होते’.
‘एक दिवस रंगायतानमध्ये दिघे साहेबांनी आमचा कार्यक्रम पाहिला होता. त्यांना तो खूपच आवडला. त्यानंतर एक दिवस त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि त्यांच्या संस्थेसाठी या कार्यक्रमाचा एक प्रयोग करायचा आहे, असं सांगितलं. त्यानुसार आम्ही तो कार्यक्रम केला. पण कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला ज्या व्यक्तीकडून मानधन मिळणार होते ती व्यक्ती परगावी गेली होती. त्यामुळे पैसे अडकून असल्याने आणि आम्हाला समोरच्याला देणं असल्याने आम्ही दिघे साहेबांची भेट घेण्याचं ठरवलो’.
https://www.instagram.com/p/CcSOjzyqAUP/
आदेश बांदेकर यांनी पुढे सांगितले की, ‘आम्ही घाबरत घाबरतच आनंद दीघे साहेबांकडे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी आदरपूर्वक आम्हाला बसायला सांगितले आणि चहाची सोय केली. त्यानंतर त्यांनी आमची चौकशी केली. तेव्हा आम्हा कलाकरांना अजून मानधन मिळाले नसल्याचे आम्ही त्यांना सांगितलो. तसेच पैसे ज्या व्यक्तीकडून आम्हाला मिळणार होते त्या व्यक्तीला आम्ही फोन केलं. तर ती व्यक्ती फोन उचलत नसल्याचंही त्यांना सांगितलो’.
‘त्यानंतर आनंद दीघे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीला निरोप पाठवला. ती व्यक्ती आनंद दीघे यांच्या ऑफिसमध्ये येणारच होती. पण तोपर्यंत साहेबांनी त्यांच्या जवळचे पैसे आम्हाला देऊ केलं. दिलेला शब्द कसा पाळायचा, हे आनंद दिघेंकडून शिकण्यासारखं होतं. तसेच एखादा कलावंत आहे आणि त्याचा सन्मान राखला पाहिजे. भले तो प्रसिद्ध असो किंवा नसो, ही त्यांची भावना मी स्वतः अनुभवली’.
आदेश यांनी म्हटले की,’यानंतर आम्हाला ठाण्यातील सर्व कार्यक्रम करण्याची संधी आनंद दिघे यांनी दिली. १९८७-८८ च्या काळात आम्ही रात्री उशीरापर्यंत काम करायचो. तेव्हाही कुठली अडचण आली तर मला सांगा, असा विश्वास आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिला होता’.
दरम्यान, ‘धर्मवीर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे करीत असून यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ठाण्याचा वाघ म्हणून ओळख असणाऱ्या आनंद दिघेंवर चित्रपट येणार असल्याने सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
एकेकाळी स्टुडिओमध्ये उलटी साफ करायची ‘ही’ अभिनेत्री, आता KGF मध्ये साकारली महत्वाची भूमिका
कपिल शर्माने तो प्रश्न विचारताच भडकला अजय देवगण, म्हणाला, तुझ्यापेक्षा तर जास्तच नंबर..
Sher Shivraj : ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी