मराठी कलाविश्वात आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) हे प्रसिद्ध जोडपे आहेत. होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. दुसरीकडे सुचित्रा बांदेकर यांनी अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. तर आई-वडिलांच्या या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा सोहमनेसुद्धा (Soham Bandekar) अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तर पदार्पणानंतर आपल्या पहिल्या-वहिल्या मालिकेसाठीच सोहमने पुरस्कार मिळवत आपले आई-वडिलांचे नाव उंचावले.
सोहम बांदेकरने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत सोहम पीएसआय जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारत आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर या मालिकेतील त्याच्या अभिनयाबद्दल नुकतंच त्याला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आलं.
यासंदर्भात सोहमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच त्याने पोस्टमध्ये त्याच्या आई-वडिलांपासून ते मित्र-मैत्रीणी, दिग्दर्शक, सहकलाकार असे सर्वांचे आभार मानले आहेत. सोहमने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे.
यामध्ये सोहमने त्याच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या हातात स्टार प्रवाह पुरस्कारही दिसून येत आहे. तसेच त्याने एक व्हिडिओसुद्धा शेअर केला. या व्हिडिओत सोहम ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील त्याच्या टीमसोबत दिसून येत आहे. नवे लक्ष्य मालिकेतील सर्व टीम या व्हिडिओत मजामस्ती करताना दिसून येत आहेत.
या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘Team या शब्दात जसे I नाही म्हणजे टीममध्ये मी नाही. तसेच Actor या शब्दातही I नाही म्हणजेच अभिनेता म्हणजे मी नाही. पण काहींचा असा समज असतो की, अभिनेता म्हणजे तुम्ही सर्वस्व आहात. यामध्ये तुमच्या भावना, तुमचे आणि तुमची उपस्थिती असते. पण, प्रत्यक्षात ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी आणि पर्यावरणाशी संबंधित आहे’.
सोहमने त्याच्या आई-वडिलांचे आभार मानताना लिहिले की, ‘आई-बाबा तुमचे खूप खूप धन्यवाद. सतत शिकत राहीन मी, रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न असेल. मी नेहमी खूप मेहनत करणार आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणार. तसेच कौटुंबिक कार्यक्रमात मी फारसा हजर नसतो, हे समजून घेतल्याबद्दल सर्व कुटुंबीयांचे आभार’, असे सोहमने या पोस्टमध्ये म्हटले.
https://www.instagram.com/p/CZLq6fuNjTG/
यासोबत सोहमने त्याचा हा पुरस्कार सर्व पोलीस अधिकारी, हवालदार, फ्रंटलाईन वर्कर्स, प्रेक्षक आणि त्याच्या सर्व हितचिंतकांना समर्पित असल्याचे म्हटले आहे. सोहमच्या या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. केदार शिंदे यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, ‘आईच्या डोळ्यातलं कौतुक लाजवाब. या पुरस्कारास तू पात्र आहेस सोहम’.
महत्त्वाच्या बातम्या :
बॅक टू बॅक दोन चित्रपट फ्लॉप होऊनही बाहुबली प्रभासला मिळाली हॉलिवूडची ऑफर; बनणार सुपरहिरो?
‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ मधील ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर
तु माझ्या आयुष्यात आलास आणि..; निवेदिता सराफ यांची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट