टॉयलेटमध्ये बसून खेळत होता व्हिडीओ गेम, तेवढ्यात चावला अजगर, दोन आठवड्यानंतर जखमेत..

अनेकांना सवय असते की ते टॉयलेटमध्ये फोन सोबत घेऊन जातात. फोन वापरता-वापरता ते बराच वेळ टॉयलेटमध्येचं बसून राहतात. मलेशियामध्ये राहणारा 28 वर्षीय तरुणही टॉयलेटमध्ये मोबाईलवर गेम खेळत होता. पण त्याच्या गेममध्ये अडथळा तेव्हा आला जेव्हा त्याच्या नितंबावर साप चावला.(a-young-man-was-playing-a-video-game-in-the-toilet-a-snake-bit-in-the-toilet)

रिपोर्टनुसार, मलेशियामध्ये राहणारा साबरी ताजाली टॉयलेटमध्ये(Toilet) बसून मोबाईलवर गेम खेळत होता. तेवढ्यात अचानक त्याच्या नितंबावर साप चावला. त्याने लगेचच एका झटक्यात साप बाजूला केला. दोन आठवड्यांनंतर, असे आढळले की त्याने साप बाजूला केला तेव्हा त्याच्या शरीरात दाताचे तुकडे तसेच राहिले.

साबरीने(Sabri Tajali) स्थानिक मीडियाला सांगितले की, ‘दोन आठवड्यांनंतर मी माझ्या जखमेची तपासणी केली तेव्हा सापाचा तुटलेला दात होता. कदाचित तो तिथेच तुटला असेल, कारण मी खूप झटका देऊन सापाला ओढले होते. साबरीने सर्वप्रथम आपल्या ट्विटरवर याबद्दल लिहिले.

त्याने सांगितले की, ही घटना त्याच्यासोबत मार्च महिन्यात घडली होती. या घटनेने तो इतका घाबरला होता की त्याने दोन आठवडे आपल्या घरातील शौचालयाचा वापर केला नाही. साबरीने सांगितले की, तो टॉयलेटमध्ये असताना सुमारे 15 मिनिटे गेम(Mobile games) खेळण्यात व्यस्त असतो.

28 मार्च रोजी त्याला अचानक वेदना झाल्या, ज्यामध्ये त्याने पहिले कि त्याचे नितंब सापाने(snake) दातांनी धरले आहे. त्याने पटकन सापाला ओढले आणि बाजूला फेकले. ते अजगर असल्याचे नंतर कळले. हा साप विषारी नसल्याचं कळल्यावर त्याला दिलासा मिळाला. तो म्हणाला, त्याचे कुटुंब 40 वर्षांपासून या भागात राहत आहे, मात्र अशी घटना प्रथमच घडली आहे.