Share

‘संबंध बिघडल्यानंतर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकत नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अनेक घटनांमध्ये महिला गैरफायदा घेत पुरुषांवर खोटे आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करताना दिसतात. यामध्ये संबंधित पुरुषांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आता अशाच एका प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका सुनावणी दरम्यान म्हटलं आहे की, पुरुषासोबत राहणारी महिला संबंध बिघडल्यावर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकत नाही. जर एखाद्या महिलेचे एखाद्या पुरुषासोबत संबंध असतील आणि ती स्वतः च्या इच्छेने त्याच्यासोबत राहत असेल तर, त्यांचे संबंध बिघडल्यावर महिला बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकत नाही.

न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवताना एका आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपीवर बलात्कार, अनैसर्गिक गुन्हे आणि धमकीचा आरोप आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की, तक्रारदार महिलेचे अपीलकर्ता पुरुषासोबत संबंध होते.

दोघे एकत्र राहत होते. आता संबंध बिघडले आहेत. पण या प्रकरणात भांदवि कलम ३७६(२) (एन)अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही. राजस्थान उच्च न्यायालयाने भांदवि कलम ४३८नुसार अटकपूर्व जामीनासाठी आरोपीचा अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी देत राजस्थान हायकोर्टाचा आदेश रद्द केला आणि अपीलकर्त्याला सक्षम अधिकार देण्यासाठी जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. याआधी राजस्थान हायकोर्टाने म्हटलं होतं की, याचिकाकर्त्याने तक्रारदार महिलेसोबत लग्न करण्याचा विश्वास देऊन संबंध ठेवले.

या संबंधामुळे एका मुलीचा जन्म झाला. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य पाहता याचिकाकर्त्याचा जामीन फेटाळण्यात आला. १९ मे रोजी या हायकोर्टाने आरोपीला अटकेच्या आदेशावर जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आपला निर्णय देत आरोपीला जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now