Share

..त्यावेळी माझं रक्त पिणारा मच्छर देखील तडफडून मरायचा, संजय दत्तचा तो व्हिडीओ पुन्हा चर्चेत

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आपल्या अभिनयातुन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपला वाईट भुतकाळ सावरत संजय दत्त पुन्हा नव्याने उभा राहिला आहे. परंतु हा भुतकाळ त्याचा पिछा सोडत नसल्याचे दिसून येत आहे. कारण की, सोशल मिडीयावर संजय दत्तचा  एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा संजय दत्तच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्याचे चित्र उभे राहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपुर्वी संजय दत्तने  एका रिऑलिटी शोमध्ये मुलाखत दिली होती. आज हिच मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्याने एक प्रसंग सांगितला आहे.

ज्यात त्याने म्हटले आहे की, असा एकही दिवस नव्हता ज्या दिवशी मी ड्रग्स घेतली नाही, त्याचा परिणाम असा झाला की, माझे रक्त पिऊन गेलेले डास देखील मरायला लागले होते. कदाचित माझ्या रक्तात औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळे असे झाले असावे. असा खुलासा त्याने केला होता.

यावेळी हा किस्सा सांगताना त्याने सांगितले की, मी झोपलेलो असताना पाहायचो की, माझ्याकडे डास आला… तो मला चावायचा मी हे देखील पाहायचो, परंतु तो मला चावायचा, त्यानंतर तो त्याचे पंख हलवायचा परंतु उडायचा नाही आणि काही वेळाने तो मरायचा. म्हणजे विचार करा माझ्या रक्तात किती ड्रग्स असतील, की नशेत त्या मच्छरला उडता देखील यायचे नाही.

पुढे बोलताना तो म्हणाला, मला कधीकधी हे आठवून हसायला देखील येतं, तो मच्छर बिचाऱ्याने विचार केला असेल की माझं रक्त तो पित आहे, परंतु तो स्वत:च मरतोय. जी नशा काम करण्यात आणि आपल्या कुटुंबासोबत राहण्यात आहे, ती कुठेच नाही. त्यामुळे मी सर्व तरुणांना सांगू इच्छितो की, ड्रग्जपासून दूर राहा.

यानंतर संजय दत्त भावनिक झाला. त्याने सांगितलेला हा किस्सा आज देखील त्याच्या चाहत्यांना हसवतो आणि भावनिक देखील करतो. सध्या व्हायरल झालेल्या संजय दत्तच्या या मुलाखतीवर अनेकांनी प्रतीक्रिया दिल्या आहेत. यापुर्वी देखील संजय दत्तचे जुने व्हिडीओ चर्चेत आले होते. परंतु त्यावर स्वत संजय दत्तने काहीच वक्तव्य केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या
‘९३ च्या दंगलीनंतर बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, पण आज मुलगा आरोपींना वाचवतोय’
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
युद्ध सुरू! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा; बाकी देशांनाही दिला ‘हा’ गंभीर इशारा
हिजाब वाद: अभिनेत्याने न्यायाधिशांवरच उपस्थित केले प्रश्न, बोलला असं काही की पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now