औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यात रात्रीच्या वेळी अचानक दुचाकी गाडीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कापूसवाडगाव येथील रहिवासी परशूराम मुठ्ठे हे त्यांच्या पत्नीसोबत दुचाकीवरुन येत असताना त्यांच्यावर बिबट्याने हा हल्ला केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, परशूराम मुठ्ठे हे पत्नीसोबत दुचाकी वाहनावरुन बाहेरगावी कामानिम्मित गेले होते. यावेळी रात्री आठ वाजायच्या सुमारास गावाकडे परतत असताना लाडगाव–कापूसवाडगाव रस्त्यावरील ओढया जवळ लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे दोघेही गाडीवरुन खाली पडली. हल्ल्यात बिबट्याने परशूराम यांच्या पत्नीच्या हाताचे लचके तोडले.
हे सर्व आपल्या डोळ्यासमोर होत असलेले पाहून परशूराम यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. परशूराम यांचा आवाज ऐकताच गावतले लोक धावून आले. गावातल्या लोकांचा जमाव बघता बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात परशूराम यांच्या पत्नीला जास्त दुखापत झाल्यामुळे त्यांना वैजापूर शहरातील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी सांगितले आहे की, जखमीच्या हाताला बिबट्याने दोन ते तीन ठिकाणी चावा घेतला आहे. त्यांना झालेली जखम ही खोलवर गेली आहे. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यामुळे गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली आहे.
त्यावरून वन अधिकारी बिबट्याचा शोध घेत आहे. गावकऱ्यांच्या माहितीनुसार बिबट्या गावातील जंगलात गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिबट्याचा शोध घेई पर्यंत गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी जपून वावरण्याचा सल्ला वन अधिकाऱ्यांनी दिला आहे. यापूर्वी देखील औरंगाबादमधून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथील चिखलठाणामध्ये विहीरीत एक मृत बिबट्या सापडला होता. यामुळे गावात चांगलीच खळबळ माजली होती. या बिबट्याच्या मृत शरीराला वन अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. यानंतर हा बिबट्या विहीरीत कसा पडला याचा शोध सुरु होता.
महत्वाच्या बातम्या
देशासाठी कायपण! रशियन सैन्याला रोखण्यासाठी बदादुर युक्रेनियन सैनिकाने स्वत:ला पुलासोबत उडवले
मालिका जिंकली तरी टिम इंडीयाचं ‘हे’ टेंशन मात्र वाढलंय; कर्णधार रोहीत शर्माची कबुली
ह्रदयद्रावक! नवजात मुलीनंतर आता वडिलांचेही निधन, भारतीय क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर
maruti suzuki ‘baleno’ चे असे पाच फिचर्स जे तुम्हाला कोणत्याच कारमध्ये पाहायला मिळणार नाही