Share

Anand Mahindra: पुणेकरांचा नाद नाय! ट्रकचे रुपांतर केले चालत्या-फिरत्या विवाह मंडपात, थेट महिंद्रांनी दिली ‘ही’ ऑफर

Anand Mahindra

Anand Mahindra, Social Media, Dayanand Darekar, Trucks/ महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा आपल्या व्यवसायाकडे जेवढे लक्ष देतात तेवढेच ते लोकांच्या सर्जनशीलतेवरही लक्ष केंद्रित करतात. त्यांना कोणाचे काम आवडले की ते लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतात. ते अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि या काळात सर्व प्रकारच्या पोस्टद्वारे आपल्या फॉलोअर्सना काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करतात.

सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांच्या एका पोस्टने पुन्हा एकदा युजर्सला आकर्षित केले आहे. महिंद्राने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक ट्रक दिसत आहे. प्रथमदर्शनी हा एक साधा ट्रक दिसत असला तरी प्रत्यक्षात तो चालता-फिरता विवाह हॉल आहे.

आगळीवेगळी गोष्ट म्हणजे या ट्रकसारख्या फिरत्या मॅरेज हॉलमध्ये 200 लोक आरामात बसू शकतात. आनंद महिंद्राने शेअर केलेल्या या छोट्या व्हिडिओमध्ये या ट्रकमध्ये एक फंक्शनही केले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. या ट्रकमध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत. हा सामान्य ट्रक असला तरी तो उघडला की लग्नमंडपात रूपांतर होते.

विशेष म्हणजे सामान्य विवाह हॉलप्रमाणेच यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या हॉलमध्ये पाहुण्यांसाठी खुर्ची-टेबलापासून ते एसी बसवण्यापर्यंत सर्व गोष्टींवर लक्ष्य देण्यात आले आहेत. त्यामुळेच या ट्रकला फिरते लग्नमंडप म्हटले जात आहे. या प्रकारच्या जुगाडू विचारसरणीचा आनंद महिंद्रावर खूप प्रभाव पडला आहे. या कारणास्तव त्यांनी या अद्भुत कल्पनेवर काम करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.

हा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, मला त्या माणसाला भेटायचे आहे ज्याचे सर्जनशील मन या उत्पादनामागे आहे. हे उत्पादन केवळ दुर्गम भागातच सुविधा देणार नाही, तर हे साधन पर्यावरणासाठीही सर्वोत्तम आहे. हे उत्पादन जास्त जागा व्यापत नाही.

आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटवर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा कल्पनेला चालना दिल्याबद्दल अनेकांनी आनंद महिंद्रा यांचे कौतुक केले आहे, तर काहींनी ही कल्पना अतिशय प्रभावी असल्याचे वर्णन केले आहे. या पोस्टला उत्तर देताना @manojgjha नावाच्या युजरने म्हटले आहे की, या विवाह हॉलचा मालक दयानंद दरेकर नावाचा व्यक्ती आहे. जो मूळचा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आहे.

महत्वाच्या बातम्या-
Rakesh Jhunjunwala: राकेश झुनझुनवालांचा गुंतवणूकीचा ‘हा’ सल्ला सर्वांनी ऐकलाच पाहीजे; आनंद महिंद्राचे आवाहन
महिंद्रा फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी गरोदर महिलेला चिरडल्यानंतर आनंद महिंद्रांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Anand mahindra : चक्क कंटेनरवरच उभारला अख्खा लग्नाचा हॉल, आनंद महिंद्राही म्हणाले, ‘मला या व्यक्तीला भेटायचंय’

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now