नुकतीच एसआरएफच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स 4.05% च्या वाढीसह रु. 2,731 वर व्यवहार करत आहेत. गेल्या तीन वर्षांत SRF शेअरची किंमत 76 टक्के CAGR ने वाढली आहे. सध्या या शेअर्स बद्दल अनेक चर्चा होत आहेत.
ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, ही कंपनी आपला व्यवसाय नवीन आणि अधिक जटिल क्षेत्रांमध्ये (फ्लोरो-केमिस्ट्री सारख्या) वाढवण्याच्या तयारीत आहे. ब्रोकरेज हाऊसने या मल्टीबॅगर स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. तसेच त्याची टार्गेट प्राइस 3,065 रुपये प्रति शेअर ठेवली आहे.
एका वर्षाच्या कालावधीत केमिकल स्टॉक 152.43% पेक्षा जास्त वाढला आहे. या वर्षी 2022 मध्ये यात सुमारे 14% वाढ झाली आहे. या केमिकल स्टॉकचा जास्तीत जास्त परतावा 1 लाख 32 हजार टक्क्यांहून अधिक आहे. SRF चे शेअर्स 23 वर्षात 2.06 रुपयांवरून 2700 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
या काळात या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना सुमारे 132,295.63 टाक्यांचा परतावा दिला आहे. म्हणजेच 23 वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये 2.06 रुपये दराने 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांना आज 13 कोटी रुपयांहून अधिक नफा झाला असेल.
तज्ज्ञांच्या मते, भारत सरकारने नुकताच हायड्रोकार्बन फ्लोरो केमिकलच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात फक्त SRF च हे रसायन तयार करते. अशा परिस्थितीत, बाजार विश्लेषकांना अपेक्षा आहे की एसआरएफला नवीन संधी मिळतील आणि स्टॉकमध्ये जोरदार तेजी येऊ शकते.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात SRF शेअरची किंमत सुमारे 2349 रुपयांवरून 2424 रुपयांपर्यंत वाढली होती, या कालावधीत सुमारे 3.5 टक्के वाढ नोंदवली गेली. गेल्या 6 महिन्यांत SRF चे शेअर्स सुमारे 1812 रुपयांवरून 2424 रुपयांपर्यंत वाढले आहेत, जे या काळात सुमारे 35 टक्के वाढले आहेत.