Share

याला म्हणतात नशीब! तब्बल २० वर्षानंतर व्यापाऱ्याला सापडला तब्बल एवढ्या कोटींची हिरा

मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा बहुमूल्य‍ हिरा सापडला आहे. या हिऱ्याला व्यापाऱ्याने सरकारी हिरा कार्यालयात जमा केले आहे. त्यानुसार येत्या २४ फेब्रुवारी रोजी हिऱ्याचा लिलाव करण्यात येणार आहे. या बहुमूल्य हिऱ्यामुळे पन्ना जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या वीस वर्षापासुन नगर किशोरगंज परिसरातील रहिवासी आणि व्यापारी सुशील शुक्ला, एका बहुमूल्य हिऱ्याच्या शोधात होते. त्यांनी अनेक खाणींमध्ये या हिऱ्यासाठी मेहनत घेऊन उत्खनन केले होते. शेवटी २७ जानेवारी रोजी त्यांना हिरा कार्यालयातून कृष्णा कल्याणपूर परिसातील हिरा खाणीत उत्खनन करण्याची परवानगी मिळाली.

परवानगी मिळताच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. यावेळी कठोर मेहनत घेऊन त्याच्या हाती तब्बल २६.११ कॅरेटचा बहुमूल्य हिरा सापडला. हिरा सापडताच सुशील शुक्ला यांचे अश्रु अनावर झाले. यानंतर त्यांनी हा हिरा हिरा कार्यालयात आपल्या नावे जमा केला.

हिरा कार्यालयाने देखील त्याचे तोंडभरुन कौतुक केले. याच हिऱ्याचा लिलाव आता येत्या २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. लिलावाचे पैसे सुशील शुक्लाल यांना मिळणार आहेत. सुशील शुक्ला यांनी केलेल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. असा हिरा शोधण्यासाठी शुक्ला २० वर्षापासुन मेहनत घेत होते.

अखेर त्याचा शोध थांबला आहे. शुक्ला यांना सापडलेला हिरा पन्ना जिल्ह्यात सापडेला सर्वात मोठा चौथा हिरा आहे. याबाबत माहिती देताना, यापूर्वी १९६१ मध्येे सर्वात मोठा ४४.४३ कॅरेटचा हिरा मिळाला होता. यानंतर २०१८मध्ये ४२.२९ तर २०१९ मध्ये २९.४६ कॅरेटचा हिरा सापडला होता.

यानंतरचा हा चौथ्या सर्वात मोठा हिरा ठरला आहे. असे हिरा कार्यालयातील अधिकारी रवि पटेल यांनी सांगितले आहे. हिऱ्याचा शोध करणारे व्यापारी यापुर्वी देखील होऊन गेले आहेत. या हिऱ्याच्या शोधात अनेकांना आपले प्राण सुध्दा गमावले आहेत.

महत्वाच्या बातम्या
सुरेश रैना ‘या’ आयपीएल टीमसोबत सुरु करणार नवी इनिंग, CSK ला करणार कायमचे बाय-बाय?
..त्यामुळे गुन्हेगार गुरमित राम रहिमला मिळणार झेड प्लस सुरक्षा, हरियाणा सरकारचा निर्णय
युवराज सिंगचे विराट कोहलीला भावनिक पत्र; म्हणाला, ‘तू माझ्यासाठी नेहमीच…’
तहसीलदारासाठी महिला कॉन्स्टेबलने नवऱ्याला सोडले अन् त्याने तिलाच संपवलं; वाचा नक्की काय घडलं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now