राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात एका तरुणाला मस्करीमध्ये जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. हा तरुण मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला आला होता. पार्टीत दारू पीत असताना मित्रांनी त्याच्याशी अशी चेष्टा केली की तो घाईघाईत छतावरून उडी मारायला लागला. यादरम्यान त्याच्यासोबत अशी घटना घडली ज्यामुळे त्याचा जीव गेला.
घाईघाईत छतावरून उडी मारताना तरुण ११ केव्ही क्षमतेच्या विजेच्या तारेच्या संपर्कात आला, आणि त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पार्टी करणारे त्याचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे पोहोचून तरुणाचा मृतदेह उचलून शवागारात ठेवला. हे प्रकरण कोटा जिल्ह्यातील सिमलिया पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री सिमलिया पोलीस स्टेशन परिसरात घडली. अपघातात बळी गेलेल्या तरुणाचे नाव नरेश कंडारा असं आहे. हा तेजपुरा बस्ती येथील रहिवासी होता. सिमलिया पोलिस ठाण्यातून त्याच्याविरुद्ध एका खटल्यासंदर्भात वॉरंट जारी करण्यात आले होते. दोन-तीन दिवसांपूर्वी पोलिस कर्मचारी नरेशला त्याच्या घरी शोधण्यासाठी गेले होते. मात्र तो घरी सापडला नव्हता.
शनिवारी रात्री नरेश बाबा रक्त्यया भैरुजी मंदिर परिसरात मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला आला होता. तिथे त्याने मित्रांसोबत वाईन प्यायली. रात्री सुमारे १० केक कापत असताना एका मित्राने गमतीने सांगितले की इथे पोलिस येणार आहेत.
हे ऐकून नरेश घाबरला आणि धावतच धर्मशाळेच्या छतावर गेला आणि तेथून खाली उडी मारायला लागला. दारूच्या नशेत अंधार पडल्याने नरेशला तिथून जाणारी ११केव्हीची विद्युत लाईन कळली नाही. अंधारात त्याच्यावर अडकल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच गोंधळ उडाला आणि पार्टी करत असलेल्या मित्रांनी पळ काढला. त्यानंतर कोणीतरी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तेथून मृतदेह उचलला. त्यानंतर पोलिसांनी रविवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.