मी तर तुझ्या परिसरात आहे! मुस्लिम व्यक्तीच्या स्वप्नात आले श्रीकृष्ण भगवान, ४० लाख खर्च करून उभारले मंदिर

सामाजिक सलोख्याचे एक अतिशय हृदयस्पर्शी प्रकरण झारखंडमधील दुमका येथून नुकतच समोर येत आहे. यात राणीश्‍वरच्या हामीदपूर येथे राहणारे, नौशाद शेख नावाचा मुस्लीम व्यक्ती ४० लाख खर्चून भगवान कृष्णाचे मंदिर बांधत आहे. भगवान श्रीकृष्णाचे मंदिर सध्या परिसरात चर्चेत आहे.(a temple built at a cost of 40 lakhs)

नौशाद यांनी २०१९ मध्ये श्रीकृष्णाच्या मंदिराचे बांधकाम सुरु केले होते. नौशाद सांगतात की, एकदा ते पश्चिम बंगालमधील मायापूरला फिरायला गेले होते. तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले. त्यांच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले होते. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितले की ‘मी तुझ्या परिसरात बसलो आहे, मग तू मला भेटायला इथे का आला आहे?’

नौशाद यांनी सांगितले की, तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना स्वप्नात सांगितलं होते की, ‘तिथेच पोहोच.’त्यानंतर नौशाद यांनी पार्थ सारथी मंदिर बांधण्याचा विचार केला. नौशाद यांनी सांगितलं की, पूर्वी इथे खुल्या आकाशाखाली देवाची पूजा केली जात होती. यानंतर त्यांनी स्वतः मंदिर बांधण्याचा विचार केला. मंदिराच्या बांधकामापासून ते सर्व विधी नौशाद स्वत: आयोजित करणार आहेत.

नौशाद म्हणतात की, इस्लाम धर्मात गरजूंची सेवा करण्यास सांगितलं आहे. यासोबतच प्रत्येक धर्माचा आदर करा, असंही म्हटलं आहे. अशाच गोष्टी सर्व धर्मात सांगितल्या जातात. पार्थ सारथी मंदिराचा अभिषेक १४ फेब्रुवारीला होणार आहे. या दरम्यान पिवळ्या कपड्यांतील १०८ महिला कलश यात्रा काढणार असून ५१ पुजारी संपूर्ण वैदिक मंत्रोच्चारात हा विधी पूर्ण करणार आहेत.

नौशाद म्हणाले की, आत्तापासून मंदिराच्या आवारात हवन करता येणार आहे. याशिवाय मंदिराच्या आवारात कीर्तन शेड, स्वयंपाकघर आणि पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांसाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात येत आहे.

हेतमपूर इस्टेटमधील पुती महाराज यांनी ३०० वर्षांपूर्वी पार्थ सारथीच्या पूजेला सुरुवात केल्याचं जाणकार सांगतात. तेव्हा या ठिकाणी हेतमपूर संस्थानाचा दरबार असायचा. त्या काळात ते जंगल महाल म्हणून ओळखलं जात होतं.

महत्वाच्या बातम्या
अल्लू अर्जुनने व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने पत्नी स्नेहाला दिल्या खास शुभेच्छा, फोटो शेअर करत म्हणाला…
बीडच्या आमदारावर चढला ‘पुष्पा’ Fever, मैं झुकेना नहीं म्हणत गाजवली सभा