Share

खासगी शाळेत विद्यार्थ्यासोबत भयानक कृत्य; विवस्त्र करून मारहाण, प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला पेन

crime news

पानिपतमधील एका खासगी शाळेत टॉयलेट सीट तुटल्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याला त्याचे कपडे काढून त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेन घुसवल्याचाही आरोप नातेवाईकांनी शाळेचे मुख्याध्यापक, त्यांची पत्नी आणि महिला रिसेप्शनिस्टवर केला आहे.

या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. याबाबत विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, मुख्याध्यापकांनी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

तहसील कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत त्या व्यक्तीने सांगितले की, त्याचा १४ वर्षांचा मुलगा जिल्ह्यातील एका खासगी शाळेत सातव्या वर्गात शिकतो. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या सुमारास शाळेच्या रिसेप्शनिस्ट आणि मुख्याध्यापक दाम्पत्याने त्यांच्या मुलावर मारहाण केली.

वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने शाळेतील टॉयलेट सीट तोडली होती, त्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला जातीवाचक शब्द म्हटले. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना शाळेतून फोन करून सांगितले की, तुमचा मुलगा आजारी आहे, त्याला घरी घेऊन जा.

कुटुंबीय त्या मुलाला घेऊन त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर मुलाने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचे सांगितले. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
‘माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, एका झटक्यात तुमची वर्दी उतरवेल..’; पोलिस स्टेशनमध्ये दारू पिऊन राडा
चिंचवडच्या पोटनिवडणूकीवरुन जगताप कुटुंबात वाद? रस्त्यावर सुरु झालाय पोस्टर वॉर
कलाटेंना उमेदवारी देताच राष्ट्रवादीत उभी फूट; स्थानिक नेत्यांनी अजितदादांविरोधात थोपटले दंड, म्हणाले आता आम्ही…

क्राईम ताज्या बातम्या शिक्षण

Join WhatsApp

Join Now