Share

महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून निष्ठेची शपथ घेणारे कट्टर शिवसैनिक दीड महिन्यात शिंदे गटात

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वीच पाचोरा तालुक्यात शिवसेनेला मोठा खिंडार पडला आहे. या तालुक्यातील कट्टर शिवसैनिक तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्यासह १०० समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

रावसाहेब पाटील यांच्यासह संपूर्ण जिल्हा परिषदेचा गट शिंदे गटात सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या या गटाने महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून निष्ठेची शपथ घेतली होती. या मोठ्या गटाने शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

माहितीनुसार, रावसाहेब पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश केला होता. हा प्रवेश सोहळा अधिकृतरित्या काल पाचोरा शहरात आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी पार पडला.

माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्या जिल्हा परिषदेचा संपूर्ण गट म्हणजेच त्यांच्या १०० समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच ते शिंदे गटात सहभागी झाल्याने खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात सध्या त्याचीच चर्चा आहे.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रावसाहेब पाटील म्हणाले, कुठल्याही आमिषासाठी आम्ही शिंदे गटात सहभागी झालेलो नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटाला पाठींबा दिला, आणि समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला.

रावसाहेब पाटील यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, रावसाहेब पाटील यांची कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. तालुकाप्रमुख ते जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा प्रवास आहे. बंड करून शिंदे गट स्वतंत्र्य झाला तेव्हा, रावसाहेब पाटलांनी महादेवाच्या पिंडेवर हात ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असल्याची शपथ २५ जूनला घेतली होती.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now