Share

बॉलिवूडच्या भाईजानने लता दीदींच्या आठवणींना दिला उजाळा, गाणं म्हणत व्हिडिओ केला पोस्ट

मागील अनेक दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात दुःखद घटना घडत आहेत. आपल्या भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोकाकुळ पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सर्वच चाहते दुःखी झाले आहेत. सर्वजण आपापल्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आठवणींना उजाळा देखील देत आहेत.

अभिनेता सलमान खानने देखील लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सलमानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान लता दीदींचे गाणं गात श्रद्धांजली वाहिली आहे. सलमानचे गाणं ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सलमान लता दीदींचे आयकॉनिक गाणे ‘लग जा गले से फिर ये हंसी रात हो ना हो..’ हे गुणगुणत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमच्यासारखे कोणीही नव्हतं ना कधी होईल, लता जी…’ या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात दाद मिळत आहे. त्याचबरोबर चाहते कमेंट्स देखील करत आहेत. खूप कमी कालावधीत सलमानचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लता मंगेशकर यांनी रविवारी(६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना या बातमीवर विश्वास ठेवणे अवघड झाले होते.

लता दीदींना पूर्ण सन्मानाने निरोप देण्यात आला. लता दीदींवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी शाहरुख खान, श्रद्धा कपूर, जावेद अख्तर, अमीर खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, लता दीदींच्या आवाजाची जादू जगभर पसरली आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. लता दीदींच्या जाण्यानंतर भारत सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता.

लता दीदींचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर संपूर्ण देशात आहे. पाकिस्तानपासून श्रीलंकेपर्यंत अनेक देशांनी लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी, श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे, भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now