काल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा T२० सामना रंगला होता. या सामन्यात के एल राहुल आणि रोहित शर्मा फलंदाजी करत असताना मैदानात एक लक्ष विचलित करणारी घटना घडली. मैदानात चक्क सापाने दर्शन दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला.
या T२० सामन्यात के एल राहुल आणि रोहित शर्माची फटकेबाजी ऐन रंगात आली होती. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासूनच दोघा फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना फोडून काढलं होतं. सुरुवातीच्या ६ षटकात जवळपास ६० धावा धावफलकावर होत्या.
रोहित-राहुलने आपले आक्रमक इरादे स्पष्ट केलेले असताना त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी मैदानात चक्क सापाने दर्शन दिलं. मैदानात आलेला साप के एल राहुलच्या दृष्टीस पडला. त्याने लगेच आरडाओरडा करून ही बाब पंचांना सांगितली. त्यानंतर, पंचांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांना सांगून सापाचा बंदोबस्त केला.
यादरम्यान चालू असलेला खेळ १० मिनिटांसाठी थांबविण्यात आला. हा प्रकार ७ षटकं संपली होती तेव्हा समोर आला. त्यावेळी के.एल.राहुल ३३ धावांवर खेळत होता तर रोहित शर्मा ३१ धावांवर खेळत होता. पूर्ण संघाचे त्यावेळी ६८ धावा एकही बाद नव्हता.
Snake 🐍 in the House #INDvsSA pic.twitter.com/CllrcwSfcJ
— Ashwani JP Singh (@ashwanijpsingh) October 2, 2022
मात्र, साप निघाल्यानंतर के एल राहुल ने लगेचच पंचांना बोलावले. त्यानंतर मैदानाबाहेरील कर्मचारी मैदानात धावत आले आणि त्यांनी या सापाला पकडलं. त्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला. मात्र या घटनेमुळे थोडा वेळ मैदानात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान काल या सामन्यात डेव्हिड मिलरची झुंज अपयशी ठरली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी निसटता विजय मिळवला. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रिले रॉसो यांना भोपळाही फोडता आला नाही. काल भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजी भोवती चांगलाच फास आवळला.