Share

Manwa Naik : अभिनेत्री मनवा नाईकसोबत मुंबईत घडला धक्कादायक प्रकार; रात्रीच्या वेळी टॅक्सीतून प्रवास करताना…

manava naik

Manwa Naik : मुंबई परिसर रात्रीच्या वेळी महिलांसाठी सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना वारंवार कानावर पडतात. मात्र या ठिकाणी उबेर टॅक्सीतून प्रवास करताना आलेल्या धक्कादायक अनुभवाबाबत मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री मनवा नाईकने फेसबुकच्या माध्यमातून मोठा खुलासा केला. तिला आलेला भयंकर अनुभव तिने यावेळी चाहत्यांना सांगितला आहे.

बीकेसी परिसरातून मनवा नाईकने उबेर टॅक्सी बुक केली होती. टॅक्सीमध्ये बसल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हर वारंवार फोनवर बोलत असल्याचे तिला आढळून आले. त्या आवाजाने हैराण झालेल्या मनवाने त्याला फोनवर बोलू नकोस, असे सांगितले. त्यावर त्या ड्रायव्हरने मनवाशी वाद घालण्यास सुरुवात केली.

पुढे जाताना त्याने सिग्नल पण तोडला. पोलिसांनी टॅक्सीचा नंबर घेत गाडी पकडल्यानंतर त्यांच्याशी पण तो वाद घालत राहिला. शेवटी मनवाने मध्ये पडून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. ती पुन्हा गाडीत बसल्यावर टॅक्सी चालकाने तिच्याशी घाणेरड्या शब्दांचा वापर करत वाद घालण्यास सुरुवात केली. व पाचशे रुपये तू देणार आहेस का? असे म्हणत अधिकच बोलायला सुरुवात केली.

टॅक्सी ड्रायव्हर सतत भांडत राहिला. त्यामुळे मानवाला इच्छित ठिकाणी जाण्यासाठी उशीर होत होता. त्यानंतर संतापलेल्या मनवाने त्याला पोलीस स्टेशनमध्ये गाडी घे, असे सांगितले. पण त्याने अधिकच वाद घालण्यास सुरुवात केली. आणि तुझ्याकडे बघून घेईन.. या शब्दात धमकी दिली. तसेच कोणाला तरी फोन लावायला सुरुवात केली.

मनवाला वारंवार तुझ्याकडे बघूनच घेईल.. असं बोलत तो ड्रायव्हर धमकावत राहिला. गाडी चुनाभट्टीच्या दिशेने घेऊन जाण्यास त्याने सुरुवात केली. तेव्हा घाबरलेल्या मनवा नाईकने त्याला गाडी थांबवण्याची विनंती केली. तेव्हा मनवाने उबेर सेफ्टीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. मनवाने त्याला गाडी थांबवण्याची विनंती करूनही तो ऐकत नव्हता.

शेवटी मनवाने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. हे बघून दोन बाईकवर चाललेल्या व्यक्तींनी टॅक्सीला गाडी आडवी घालत त्या प्रसंगातून मनवाची सुटका केली. प्रचंड घाबरलेल्या मनवाने आपला हा भयानक प्रसंग फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी शेअर केला व आता आपण सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा मुंबईत महिलांच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
Ram Temple : २०२३ मध्ये बांधकाम पुर्ण झाल्यावर कसे दिसेल भव्य राममंदिर? ट्रस्टने शेअर केले खास फोटो
BJP : सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत प्रख्यात गुंडाचा भाजपात प्रवेश; हत्या, अपहरणाचे तब्बल ११ गुन्हे दाखल
Krushna yadav : कमाल; लोणचे विकून अशिक्षित महिलेने उभारले करोडोंचे साम्राज्य, वाचा प्रेरणादायी कहाणी

 

ताज्या बातम्या इतर मनोरंजन

Join WhatsApp

Join Now