Share

तिरंगा लावण्यासाठी चढले छतावर, घराची कौलं फुटल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा पडून मृत्यु

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देशभरात लोकं जय्यत तयारी करत आहेत. केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. अशातच एक दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली. तिरंगा लावण्यासाठी छतावर चढलेल्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (A senior citizen fell down and died due to the collapse of the roof of the house)

जव्हार जिल्ह्यातील राजेवाडी येथील रहिवासी लक्ष्मणभाऊ शिंदे हर घर तिरंगा उपक्रमात सहभाग घेत आपल्या घरावर झेंडा लावण्यासाठी चढले होते. घराची कौलं फुटली आणि ते खाली पडले.

या अपघातात ते गंभीर जखमी झाले, डोक्याला जबर मार लागला. त्यांना तातडीने जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नाशिकमधील रुग्णालयात उपचारसाठी नेण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशोकभाऊ शिंदे हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमधून सेवा निवृत्त झाले होते. ६५ वर्षीय अशोकभाऊ मोठ्या उत्साहाने शनिवारी सकाळी ८:३० च्या सुमारास आपल्या घरावर झेंडा लावण्यासाठी गेले होते.

मात्र छतावरून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जव्हार ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. पंतप्रधान मोदींनी हर घर तिरंगा मोहिमेपेक्षा जव्हार, मोखाडा भागात आरोग्य सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी, रस्ते आणि शिक्षण या सुधारणा करायला हव्या आहेत, असं ग्रामस्थांनी म्हंटलं.

यावरून सरकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत खेडोपाडी पूर्णपणे पोहचल्या नाहीत,असेच म्हणावे लागेल. प्रत्येक घराला रोजगार मिळायला हवा, घरावर फक्त तिरंगा लावून प्रश्न सुटणार नाहीत, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-
विनायक मेटेंचा घातपात की अपघात? मराठा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक, केली चौकशीची मागणी
Nitin Gadkari : फडणवीस दिल्लीत गेले तर ‘या’ नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी, गडकरींचे मोठे वक्तव्य
फडणवीसांचा मोठा खुलासा, विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता केला होता मेसेज, म्हणाले..

 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now