Share

Gautam Adani : उद्धव ठाकरे आणि गौतम अदानींमध्ये मातोश्रीवर झाली गुप्त बैठक, दोघांनी १ तास केली चर्चा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यामुळे संपूर्ण शिवसेना खिळखिळी झाली. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटाची वाट धरू लागले. शिवसेनेला मोठी गळती लागली. शिवसेनेची अशी अवस्था असताना जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भेट घेतली आहे.

गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांच्या भेटीचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान, अदानी यांनी भाजपनेते आशिष शेलार यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे अदानी यांच्या राजकीय भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जातात. व्यापार-उद्योग आणि रोजगारीवरून सध्या राज्यात विरोधकांकडून घमासान सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि रोजगार दुसऱ्या राज्यात जात असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. असं असताना गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नुकतेच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानावर भाषण केलं. काल मुंबईत शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतच शिंदे गटावर देखील जोरदार हल्लाबोल चढवला.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘दिल्लीत जाता मग पंतप्रधानांना ठणकावून विचारून दाखवा, वेंदाता महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राला सवलत का देण्यात आली नाही? दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी शिंदे गटाची अवस्था असल्याचं म्हणत ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.

यावर एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेत प्रतिउत्तर दिलं. म्हणाले, आम्हाला अभिमान आहे की आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? असा खोचक सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. राजकारणात अशी स्थिती असताना अदानी यांच्या भेटीमागचे नेमकं कारण काय याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now