health मानवी शरीरातील डोळे हा अवयव अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. मात्र याच बाबतीत एक गंभीर प्रकार घडला. वृद्ध व्यक्तींच्या डोळ्यावर उपचार करण्याच्या नावाखाली एका नेत्र रुग्णालयात वृद्धांचे खरे डोळे काढून घेत त्याच्या जागी काचेचे डोळे बसवण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत.
हा धक्कादायक प्रकार झारखंडमधील घाटशील भागात घडला आहे. किटाडीह गावाच्या अंगणवाडी सेविकेने गावातील रहिवासी गंगाधर सिंह ( वय ७०) यांच्यासह ८ वयोवृद्ध लोकांना जमशेदपूर येथील के के सी नेत्र रुग्णालयात उपचारासाठी नेले. या ठिकाणी डोळ्यांवर उपचार घेऊन आल्यानंतर गंगाधर यांचा डोळ्याला पुन्हा त्रास झाला.
कुटुंबीयांनी नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधून त्यांना पुन्हा रुग्णालयात पाठवले. त्या ठिकाणी दोन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर पुन्हा गंगाधर सिंह हे उपचार घेऊन घरी परतले. आणि एकदा डोळ्याला खाज सुटली व त्रास होऊ लागला. तेव्हा डोळा चोळीत असताना त्यांना डोळ्यात काचे सारखं काही असल्याचे जाणवले.
तेव्हा घाटशीला उपविभागीय रुग्णालयात तातडीने गंगाधर सिंह गेले. तेव्हा डॉक्टरांनी केलेल्या तपासणीतून त्यांचा खरा डोळा काढून घेतल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानंतर ही बातमी माध्यमांमध्ये पोहोचताच मोठी खळबळ राज्यामध्ये उडाली. संबंधित रुग्णालय आणि अंगणवाडी सेविकेबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
गंगाधर सिंह यांनी या सर्व प्रकरणा विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या वृद्धांना उपचारासाठी नेणारी आरोग्य सेविका फरार आहे. तसेच ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने आरोग्य मंत्री बनी दत्ता यांनी आरोपींचा शोध घेण्याचे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत.
ज्या रुग्णालयामध्ये असे गैरप्रकार घडत असतील. आणि याप्रकरणीचे जबाबदार सापडतील, अशा रुग्णालयांचा परवाना आरोग्य विभागाकडून रद्द केला जाईल, असे देखील आरोग्यमंत्री दत्ता यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे डोळे तपासणी आणि उपचाराचे कारण देत खरे डोळे काढून काढण्याचे एवढे मोठा गंभीर गैरप्रकार झारखंडच्या एका गावात घडला आहे. आता या प्रकरणात संबंधित आरोपींचा शोध घेत कशाप्रकारे कारवाई केली जाते. हे पाहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या-
politics : शिवसेना स्थापना झाली तेव्हा तु कोंबडीची पीसं उपटत होता काय? तुझी उंची किती, डोकं केवढं
Vinayak Raut : २००३ मध्ये आम्ही बाळासाहेबांना डावलून..; विनायक राऊतांनी जाहीर सभेत कबुल केली चूक
Ajay Devgn: कैथीच्या हिंदी रिमेकमध्ये अजय देवगणला पाहून साऊथ अभिनेता म्हणाला, अनेकांनी मला फोन करून…