Share

achievement : कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी; या जगप्रसिद्ध कंपनीने दिले तब्बल ६० लाखांचे वार्षिक पॅकेज

anamika dakare

achievement : परिस्थिती कितीही बेताची असली तरी आपली इच्छाशक्ती असेल तर प्रयत्नांच्या बळावर माणूस स्वप्नाला गवसणी घालू शकतो. याची अनेक उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. मात्र आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपली दखल घेण्यास जगप्रसिद्ध कंपनीला भाग पाडण्याचे कौशल्य ग्रामीण भागातील एका तरुणीमध्ये आढळले. तिचे हे प्रेरणादायी यश आज आपण जाणून घेऊया.

हे उदाहरण आहे. कोल्हापुरातील सोनाळी गावची रहिवासी असणाऱ्या अनामिका डकरे या तरुणीचे.. अनामिका ही कम्प्युटर इंजिनियर आहे. तिचे वडील पेशाने शिक्षक असून आई गृहिणी आहे. अनामिकेच्या वडिलांनी कायमच तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

अनामिकाने पॉलिटेक्निकमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डी वाय पाटील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये पुढील शिक्षणात सुरुवात केली. कम्प्युटर इंजीनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना तिची Adobe या प्रसिद्ध कंपनीने टेक्निकल ऑफिसर म्हणून नेमणूक केली. पुढे तिने याच कंपनीमध्ये इंटर्नशिप केली.

इंटर्नशिपनंतर तिला Adobe कंपनीने कायमस्वरूपी नोकरीवर रुजू करून घेतले. यासाठी ६० लाखांचे वार्षिक पॅकेज अनामिकाला देण्यात आले आहे. अनामिकाच्या या घवघवीत यशाने तिचे कुटुंबीय भारावून गेले. या यशाचा तिच्या महाविद्यालयाला अभिमान असून प्राचार्यांकडून तिचे अभिनंदन करण्यात आले.

कोल्हापुरातील ग्रामीण भागातल्या मुलीला एवढ्या मोठ्या रकमेचे पॅकेज मिळणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे शिक्षण घेत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जे तरुण धडपड करतात. अशा तरुणांसाठी अनामिका डकरेचे यश येत्या काळात प्रेरणादायी ठरणार आहे.

अनामिका डकरेने कोल्हापूरचे नाव महाराष्ट्रभर केल्याने तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एवढे मोठे पॅकेज मिळवणारी अनामिका अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. तिच्या या यशाचे कौतुक ऋतुराज पाटील यांनीही केले. तसेच पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
Maratha Kranti Morcha : मराठा मोर्चा समन्वयक रमेश केरेंनी फेसबूक लाईव्ह दरम्यान प्यायले विष; धक्कादायक कारण आले समोर
Manwa Naik : अभिनेत्री मनवा नाईकसोबत मुंबईत घडला धक्कादायक प्रकार; रात्रीच्या वेळी टॅक्सीतून प्रवास करताना…
Ram Temple : २०२३ मध्ये बांधकाम पुर्ण झाल्यावर कसे दिसेल भव्य राममंदिर? ट्रस्टने शेअर केले खास फोटो

 

ताज्या बातम्या इतर व्यवसाय

Join WhatsApp

Join Now