श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्ही अजूनही आपल्या आजूबाजूच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळतात. अगदी लहान मुलांपासून सर्वांनाच माहिती असलेली बाब म्हणजे ‘ग्रहण’..! ग्रहणाबद्दल अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार आहेत. विशेष बाब म्हणजे गर्भवती महिलांवर ग्रहणाचा जास्त प्रभाव होतो, असं बोललं जातं.
ग्रहणात काहीही खायच नसतं, ग्रहण काळात भाजी चिरणे, फळे तोडने, अन्न ग्रहण करणे, मांडीवर मांडी घालून बसने वर्ज असते. मात्र यालाच अपवाद असलेली बातमी आता समोर आली आहे. एका गर्भवती महिलेने चक्क सूर्यग्रहण पाहिले आहे. महिलेने अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी ग्रहणाशी डोळे भिडवले.
सध्या महिलेच्या या धाडसाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, ही महिला चार महिन्यांची गर्भवती आहे. अंधश्रद्धेला खातं – पानी न घालता या महिलेने हे धाडस दाखविले आहे. समाजला एक वेगळाच आदर्श या गर्भवती महिलेने दिला आहे. जाणून घ्या सविस्तर..
इस्लामपूर येथे राहणाऱ्या पूजा ऋषीराज जाधव यांनी हे धाडस दाखविले आहे. पूजा जाधव व त्यांचे पती ऋषिराज मोहन जाधव हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. या जोडप्याने पुढाकार समाजातील ग्रहण न पाहण्याच्या अनिष्ठ प्रथेला मंगळवारी मूठमाती दिली. नवीन आदर्श समाजासमोर ठेवला.
दरम्यान, सोलर चष्म्यातून पूजा जाधव यांनी ग्रहण पाहिले. पूजा यांनी थेट काळवंडलेल्या सूर्याशी डोळेही भिडवले. एवढंच नाही तर पूजा यांच्या या धाडसाला पाठिंबा देण्यासाठी घरातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले. पूजा यांनी एक अनोखा आदर्श तयार केला आहे.
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर