politics : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात फक्त शिवसेनाच नव्हे तर सर्वच राजकीय पक्ष अशांततेच्या दरीत ढकलले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून इतर पक्षाच्या नेत्यावर, त्यांच्या महत्त्वकांक्षांवर बोट ठेवत आरोप होत असतात. याचप्रमाणे आता राष्ट्रवादीबाबत मोठे वक्तव्य भाजपकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘अजित पवार गृहमंत्री असायला हवे होते.तशी त्यांची पात्रता आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस- शिवसेनेमध्ये अशांतता आहे. तशीच धुसफूस राष्ट्रवादीमध्ये पण सुरू आहे. त्यामुळे अडीच वर्ष महाराष्ट्र मागे पडला,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, ‘लवकरच एक दिवस असा येणार की, राष्ट्रवादीमध्ये मोठा राजकीय ब्लास्ट होणार, असा दावा यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. या मागची पार्श्वभूमी लक्षात घेता आपल्याला हे प्रकरण काय आहे ते कळेल.
दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अजित पवार म्हणाले होते की, ‘गृहमंत्रीपद द्या, गृहमंत्रीपद द्या.. मी किती वेळा म्हणालो. पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. वरिष्ठांना वाटलं की, गृहमंत्री झाल्यावर हा आपलं सुद्धा ऐकणार नाही.’ अजित पवारांच्या याच वक्तव्यावर बावनकुळे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
आदित्य ठाकरेंनी तळेगावात केलेल्या आंदोलनाबद्दल पण त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘खोटं बोल पण रेटून बोल, असं सगळं आदित्य ठाकरेंकडून सुरू आहे. वेदांताच्या प्रकल्पाबाबत जागा आरक्षित केल्याचा दावा ते करतात. मग त्यांनी जागा आरक्षित केल्याचा आदेश दाखवावा.’
‘कंपनीला ठाकरे सरकारकडून पाठवण्यात आलेले पत्र दाखवावे. आणि मग याबाबत बोलावे, असं बावनकुळे म्हणाले. ‘वास्तव हेच आहे की, ठाकरे सरकारकडून याबाबत दिरंगाई झाली आहे,’ असा सणसणीत आरोप यावेळी माविआ सरकारवर बावनकुळे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या-
Shinde group : गुवाहाटीहून सेनेत परतलेल्या आमदारानेच ठाकरेंना खाली खेचण्याची shinde group : घातली होती गळ; संदीपान भुमरेंचा गौप्यस्फोट
student : दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गातच अचानक मृत्यू; वाचा सरकारी शाळेत नेमकं घडलं काय?
raj thackeray :’दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी आधीच दिला होता मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला’