बिहारची राजधानी पटना येथे एका पोलिसाचा मृत्यू झाला. पोलीस कर्मचाऱ्यानी 24 तासांपूर्वी हेयर ट्रांसप्लांट केले होते. हेयर ट्रांसप्लांटनंतर जवान आपल्या क्वार्टरमध्ये गेला. रात्री त्यांची तब्येत ढासळू लागली. त्याचे डोके दुखू लागले आणि छातीत जळजळ सुरु झाली. जवानाची प्रकृती खालावलेली पाहून त्याच्या साथीदारांनी त्याला हेयर ट्रांसप्लांट केंद्रात नेले, तेथून त्याला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.(A policeman who underwent a hair transplant 24 hours ago died)
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार स्पेशल आर्म्ड पोलिस (BSAP) मध्ये तैनात जवान मनोरंजन पासवान यांचे केस गळले होते. 11 मे रोजी त्यांचे लग्न होणार होते. त्यामुळे त्यांनी हेयर ट्रांसप्लांट करण्याचा निर्णय घेतला. मनोरंजन पासवान यांनी हेयर ट्रांसप्लांटसाठी पटना येथील बोरिंग रोड येथील हेअर ट्रान्सप्लांट आणि स्किन केअर सेंटरशी संपर्क साधला.
मनोरंजन पासवान यांच्यावर केंद्रातून उपचार सुरू झाले होते. मनोरंजन पासवान यांचे बुधवारी 9 मार्च रोजी हेयर ट्रांसप्लांट झाले. हेयर ट्रांसप्लांटनंतर मनोरंजन पासवान आपल्या पोलिस क्वार्टरमध्ये आले. रात्री डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ते खाऊन पिऊन झोपी गेले. झोपल्यानंतर काही वेळातच त्याच्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या.
मनोरंजन यांनी सहकाऱ्यांना माहिती दिल्यावर साथीदारांनी त्याला हेअर ट्रान्सप्लांट अँड स्किन केअर सेंटरमध्ये नेले जेथे त्याचे हेयर ट्रांसप्लांट झाले होते. रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी मनोरंजन पासवान यांना पाहिले आणि त्यांना रुबन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रेफर केले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
रुबन मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर AK Singh यांनी सांगितले की, जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. हॉस्पिटलमध्ये तैनात असलेल्या प्लास्टिक सर्जन, कार्डियाक सर्जन, इंटरनल मेडिसिन आणि आयसीयूच्या सर्व तज्ञांनी उपचार सुरू केले, परंतु काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पाटलीपुत्र पोलीस स्टेशनने दिली आहे. हेयर ट्रांसप्लांटसाठी कोणती औषधे दिली गेली? प्रतिक्रिया काय होती? दुसरा तपास अहवाल आल्यानंतरच हे कळेल. अहवाल आल्यानंतर समजेल की हेयर ट्रांसप्लांटमध्ये वापर केलेल्या औषधांचा काही साईड इफेक्ट झाला आहे का?
महत्वाच्या बातम्या-
सहा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका; पीएफ वरील व्याजात प्रचंड घट
द कश्मीर फाईल्स चित्रपट पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, टूटे हुए लोग बोलते नहीं है, उन्हें सुनना पडता है
VIDEO: जबरदस्त ऍक्शन स्टंट करताना दिसली दिशा, व्हिडीओ पाहून लोकांनी काढली टायगरची आठवण
काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षही ठरला!, सोनियांनी दिला राजीनामा पण