महाराष्ट्रातील पवार कुटुंब राजकिय घडामोडींमुळे सतत सोशल मिडीयावर चर्चेत असते. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तर माध्यमांच्या नेहमीच केंद्रस्थानी असतात. परंतु सध्या या दोघांव्यतिरिक्त पवार कुटुंबातील तीसराच व्यक्ती एका वेगळ्या कारणावरुन सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे.
नुकताच अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जय पवारांसोबत फोटोत दिसणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे. या फोटोला ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे.
या फोटोत अभिनेत्री उर्वशी , जय पवार आणि एक तीसरा व्यक्ती कॅमेरात पोज देताना दिसत आहे. माध्यमांच्या माहितीनुसार हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जय पवार याठिकाणी उर्वशीसोबत काय करत होते असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मुख्य म्हणजे, फोटो व्हायरल झाल्यानंतर उर्वशी जय पवारांची गर्लफेंन्ड असल्याचे देखील बोलले जात आहे. परंतु अद्याप या फोटोबाबत कोणताही उलगडा झालेला नाही. दरम्यान जय पवारांसोबत दिसलेली उर्वशी लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/Cbe1tlkq3F_/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी तिने ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयातून उर्वशीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्वशी सोशल मिडीयावरही अँक्टीव असते. सध्या ती जय पवारांसोबत काढलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.
दुसरीकडे जय पवार यांच्याविषयी सांगायचे झालेच तर, जय पवार राजकिय क्षेत्रात जास्त प्रमाणात सक्रिय असलेले दिसून येत नाहीत. मध्यंतरी भाजपा नेते किरीट्ट सोमय्या यांनी जय पवारांवर गंभीर आरोप लावले होते. यावेळी त्यांनी मी लवकरच जय पवारांचे कारनामे उघडकीस आणेल असा इशारा पवार कुटुंबीयांना दिला होता.
महत्वाच्या बातम्या
महिला पोलिस म्हणाली, ‘रिक्षा नीट चालव’, संतप्त रिक्षाचालकाने तिला रिक्षात ओढलं आणि.., पुण्यातील धक्कादायक प्रकार
‘त्या’ प्रकरणाची लक्षवेधी विधानसभेत न लावल्याने आमदार सुनील शेळकेंना कोसळले रडू, म्हणाले..
‘गंगूबाई काठियावाडी’ पाहण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्याने उचलले ‘हे’ पाऊल; बायकोही झाली थक्क
ज्याला भुताटकी म्हणायचे, तोच बंगला विकत घेऊन राजेश खन्नाचे चमकले नशीब; दिले अनेक हिट चित्रपट