सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडीओ मजेशीर असतात,तर काही धाडसाचे. काही व्हिडीओ मधून समाजासाठी काहीतरी चांगला मेसेज मिळत असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक धाडसी व्हिडीओ समोर येत आहे, पण हा व्हिडीओ कोणा व्यक्तीच्या धाडसाचा नसून, पक्षांच्या धाडसाचा आहे.
आपल्याला तर माहिती आहे की एखादी आई आपल्या मुलांच्या रक्षणासाठी काहीही करायला तयार असते. हीच गोष्ट प्रत्येक समुदायात दिसते. मग ते प्राणी असो, पक्षी असोत. या व्हिडिओमध्ये आपल्या पिल्लांना सापापासून वाचवण्यासाठी पक्षांच्या जोडीने दिलेली सापासोबतची झुंज दिसत आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. पक्षांच्या घरट्यात घुसून त्यांच्या पिल्लांची शिकार करू पाहणाऱ्या सापाला पक्षाच्या जोडीनं असं काही केलं, की शेवटी सापाला हार मानावी लागली आणि तो पळून गेला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये घनदाट जंगलात एका काटेरी झाडावर एक विषारी साप पक्ष्यांच्या घरट्यावर हल्ला करताना दिसत आहे. पक्षी सहसा जंगलातील भक्षक प्राण्यांपासून घरटे सुरक्षित ठेवण्यासाठी झाडांच्या सर्वांत उंच फांद्यांवर घरटी बनवतात.
अशाच एका झाडावर असलेल्या घरट्यात पिल्लांची शिकार करण्यासाठी साप आला. त्याने घरट्याला विळखा घातला होता. त्याच वेळी पक्षांची जोड आपल्या पिलांना वाचवण्यासाठी त्याठिकाणी आली. त्यांनी त्या सापाला आपल्या चोचीने टोची मारायला सुरुवात केली.
जंगलात या पक्षांच्या जोडीचा आपल्या पिलांना वाचवण्यासाठी आटापिटा सुरू झाला. जंगलात पक्षांची एकच किलबिल झाली. त्यानंतर त्या दोन पक्षांपुढे सापाला हार मानवी लागली. त्याला पिल्लांची शिकार करता आली नाही, आणि तो तिथून निघून गेला. व्हिडीओ पाहून अनेकजण चकीत झाले.
.