thief : चोरी करण्यासाठी चोर काय काय शक्कल लढवतील, याचा नेम नाही. अशीच एक भयंकर विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे. एक चोरटा रात्री चोरी करण्यासाठी बाहेर पडताना अंगाला तेल लावायचा. पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत रस्त्यावरून फिरायचा, ज्यामुळे त्याला कोणी पकडू नये. अंधाराचा फायदा घेत तो चोरटा मौल्यवान वस्तूंची चोरी करायचा.
ही विचित्र घटना ठाणे जिल्ह्यातील दिघा परिसरात घडली आहे. तो चोरटा रात्री निर्वस्त्र अवस्थेत रस्त्यावरून फिरत चोरी करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या चोरट्याची धास्तीच परिसरातील लोकांनी घेतली होती.
अंगावर कसलेच कपडे न घालता रोडवर फिरणाऱ्या विक्षिप्त चोरट्याबाबत परिसरातील पोलिसांपर्यंत तक्रार गेली. त्यानंतर पोलिसांनी निर्वस्त्र अवस्थेत अंगाला तेल लावून चोरी करण्यासाठी फिरणाऱ्या या चोरट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.
सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना त्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांना तो दिघा परिसरातील चिंचोळ्या आकाराच्या गल्ल्यांमध्ये फिरताना दिसला. पोलिसांनी सापळा रचून त्या चोराला ताब्यात घेतले आहे. अशा विचित्र प्रकारे चोरी करणाऱ्या त्या व्यक्तीचे अवघे २४ वर्ष वय असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली.
पोलिसांनी त्या व्यक्तीला कळवा भागातून अटक केली आहे. त्यामुळे आता दिघा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या चोरट्याला सापळ्यात अडकवण्याचे काम रबाळा पोलिसांनी केले आहे. मात्र अटक केलेल्या व्यक्तीचा तपास करताना अजून एक धक्कादायक बाब समोर आली.
त्या चोरट्याला डेंग्यूची लागण झाली असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याची प्रकृती बरी होताच त्याला पुन्हा ताब्यात घेऊन, त्याची रवानगी पोलीस कोठडीत करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाप्रकारे नग्न अवस्थेत फिरणाऱ्या चोरट्याचा एकदाचा बंदोबस्त पोलिसांनी केल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; वाईन विक्रीवरून भाजप-शिंदे गट आमने सामने, नेमकं प्रकरण काय?
jayant patil : अनेक आमदार म्हणतात आम्ही परत आलो तर चालेल का? जयंत पाटलांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट, शिंदेंची उडाली झोप
Crime : व्हिडीओ कॉलवर बोलता बोलताच महिला झाली विवस्त्र, पुढे जे घडले ते वाचून धक्का बसेल