Share

एकतेचे जिवंत उदाहरण! मुस्लीम व्यक्तीने हिंदू मित्रासाठी दान दिली स्वताची किडणी

देशातील हिंदू मुस्लिम वादाने सर्व सीमारेषा पार केल्या आहेत. परंतु अजूनही माणुसकी जिवंत असल्याची उदाहरणे आपल्याला पाहिला मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या एका मुस्लीम व्यक्तीने आपल्या हिंदू मित्राला किडनी दान करून हे एकतेचे उदाहरण जिवंत ठेवले आहे. या मुस्लीम व्यक्तीमुळे एका हिंदूला नवीन जीवन मिळाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हसलू मोहम्मद नामक व्यक्ति अचिंत्य बिस्वास या हिंदू व्यक्तीचा खूप जुना मित्र आहे. हे दोघे एकेकाळी एकाच कंपनीत काम करत होते. मात्र एकेदिवशी अचानक अचिंत्यला तात्काळ ट्रान्सप्लांटची गरज असल्याची माहिती हसलूला समजली. त्यामुळे त्याने आपली एक किडनी अचिंत्यला दान करण्याचा त्वरित निर्णय घेतला.

त्यानुसार हसलूने राज्य आरोग्य विभागाकडे अर्ज करून अवयव दान करण्याची परवानगी मागितली. अवयव दान करण्याच्या प्रक्रियेनुसार विभागाने हसलूला पोलिसांकडे पाठवले. हसलू अवयव दान करण्याचा निर्णय का घेत आहे, तो बेकायदेशीर काही काम करतोय का, याची सर्व चौकशी पोलिसांनी केली.

यानंतर हसलूकडून मिळालेली माहिती पोलिसांनी आरोग्य विभागाकडे जमा केली. या सर्व गोष्टींची तपासणी झाल्यानंतर विभागाने हसलूला किडनी दान करण्याची परवानगी दिली. या परवानगीच्या आधारेच डॉक्टरांनी हसलूची एक किडनी अचिंत्यला दान केली. यामुळे आता अचिंत्यला नवीन आयुष्य मिळाले आहे.

याविषयी बोलताना अचिंत्यने म्हणले आहे की, ‘हसलूने केवळ माझा जीव वाचवण्यासाठी इतकं मोठं बलिदान देण्याचा निर्णय घेतला. मी आणि माझा परिवार त्याचे नेहमी आभारी राहू. जर तो पुढे आला नसता तर माझ्या मृत्यूनंतर माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं’

तर दुसरीकडे किडनी दान केल्यानंतर हसलूने सांगितले आहे की, जेव्हा मला समजलं की, अचिंत्यला तात्काळ ट्रान्सप्लांटची गरज आहे. तर मी माझी एक किडनी दान देण्याचा निर्णय घेतला. असं करून मी मरणार नाही. मात्र अचिंत्यला एक नवं जीवन मिळेल.

मुख्य म्हणजे, आमचा धर्म वेगळा असू शकतो, पण आमचा ब्लड ग्रुप एकच असल्याचे हसलूने म्हणले आहे. सध्या डॉक्टरांनी अचिंत्यला डायलिसिससाठी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. अचिंत्यवरील सर्व उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या
महाविकास आघाडीला धक्का! ‘हा’ प्रमुख पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत
‘द कश्मीर फाइल्स’मुळे विवेक अग्निहोत्रींना ‘Y’ दर्जाची सुरक्षा; CRPF कडून होणार रक्षण
“इस्लाम हाच आपल्या देशाचा खरा शत्रू” संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
राखी सावंतचा ‘हा’ व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल

ताज्या बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now