Share

कान्स फेस्टिवलमधून परतताच बच्चन कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचा मृत्यु

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) अलीकडेच त्याची पत्नी आणि मुलगी आराध्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ (Cannes Film Festival 2022) मध्ये सहभागी  होऊन परतला आहे. येताच बच्चन कुटुंबाला एक दु:खद बातमी कळाली, ज्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबाला धक्का बसला आहे. ही बातमी अभिषेक बच्चनने इंस्टाग्रामद्वारे चाहत्यांना कळवली. (Abhishek Bachchan, Cannes Film Festival 2022, Tragic News)

अभिनेता अभिषेक बच्चनने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, आपल्या कुटुंबाच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या खूप जवळ असलेले कॉस्च्युम डिझायनर अकबर शाहपूरवाला आता या जगात नाहीत. बच्चन कुटुंबासाठी ही बातमी खूप दुःखद आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.

अभिषेकने त्याच्या इंस्टाग्रामवर असेही सांगितले की, अकबरने बिग बींसाठी अनेक सूटचे कापड स्वतःच्या हाताने कापून शिवले होते. त्याने अभिषेकसाठी लहानपणी पहिला सूटही तयार केला होता. जो आजही अभिषेकने सांभाळून ठेवला आहे. यादरम्यान अभिषेकने अकबर शाहपूरवाला यांच्याशी संबंधित अनेक आठवणीही शेअर केल्या आहेत.

अभिषेकने असेही सांगितले की अकबर शाहपूरवाला त्याच्या दृष्टीने जगातील सर्वोत्तम सूट निर्माता होता. अभिषेकने शेवटी भावनिक अल्फासह अकबर शाहपूरवालाची आठवण काढली आणि लिहिले की तुम्ही माझ्यासाठी जे सूट बनवले आहेत, त्यापैकी एक मी आज रात्री घालेन आणि त्यामुळे मला धन्य वाटेल! तुमच्या आत्म्याला शांती लाभो’.

अभिषेकने पोस्ट शेअर केल्यानंतर, अनेक सेलिब्रिटींनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना केली.  बॉबी देओलने हात दुमडलेल्या इमोटिकॉनसह तुटलेले हृदयाचे इमोजी पोस्ट केले. अभिषेकची बहीण श्वेता बच्चनने लिहिले, “(हात जोडून इमोजी) अनेक आठवणी. त्यांना शांतता लाभो.” करण जोहरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, ‘मला त्यांची खूप आठवण येईल’.

महत्वाच्या बातम्या-
आई ऐश्वर्यासोबत कार्पेटवर उतरली आराध्या बच्चन, क्यूटनेस पाहून लोकं झाले फॅन, पहा फोटो
चक्क अमिताभ बच्चनलाही पडली महाराष्ट्राची हास्यजत्राची भुरळ, प्रसाद ओकने सांगितला किस्सा
अमिताभ बच्चन अभिषेकला रोज महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला सांगतात प्रसाद ओकने शेअर केला भन्नाट किस्सा,
अभिनेत्री ऐश्वर्या रायचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद, रागाने लालबुंद झालेला अभिषेक बच्चन सगळ्यांसमोर भडकला

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now