Virat Kohli : रविवारी टी-२० विश्वचषक २०२२ चा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पार पडला. या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. या सामन्यात विराट कोहलीकडून एक मोठी चूक घडली आणि भारताला हा सामना गमवावा लागला.
या सामन्यात विराट कोहलीने एडन मार्करामचा एक सोपा झेल सोडला. विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तो त्याच्या शानदार क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. मात्र या सामन्यात त्याने ३५ धावांच्या स्कोअरवर एडन मार्करामला जीवदान दिले.
त्यानंतर मार्करामने शानदार अर्धशतक झळकावत दक्षिण आफ्रिकेला सामन्यात परत आणले. विराटने मार्करामचा झेल सोडला तेव्हा अश्विन गोलंदाजी करत होता. विराटकडे जाणारा चेंडू पाहून अश्विनने महत्त्वाची विकेट आपल्याला मिळाली आहे, असे गृहीत धरले होते.
पण जेव्हा कोहलीने हा झेल सोडला तेव्हा अश्विनचा विश्वासच बसत नव्हता. विराटला झेल सोडताना पाहून अश्विनला आश्चर्य वाटले. टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्याची सुरुवातच खराब झाली.
खरंतर मार्कराम ३५ धावांवर असताना विराट कोहलीने त्याचा एक सोपा झेल सोडला.मार्करामने या संधीचा पुरेपूर फायदा घेत ५२ धावा केल्या. तसेच आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताने ४९ धावांमध्ये पहिल्या ५ विकेट्स गमावल्या. भारतीय संघाने या सामन्यात ९ गडी गमावत १३३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटकात ५ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.
महत्वाच्या बातम्या
dinesh kartik : टीम इंडियाला मोठा धक्का, आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ मॅचविनर खेळाडू जखमी
Rohit : पराभवानंतर प्रचंड भडकला रोहीत; ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार, जाहीरपणे काढली खरडपट्टी
IND VS SA : आम्ही स्वताहूनच आफ्रिकेला जिंकण्याची संधी दिली; रोहित शर्माचे सामन्यानंतर धक्कादायक वक्तव्य
ह्रदयाची धडधड वाढवणाऱ्या सामन्यात भारत अखेरच्या षटकात पराभूत, पाकीस्तान विश्वचषकाच्या बाहेर