Crime News: नाशिकमधील ह्रदय हेलावनारी घटना ७ मुले गायब झाल्यावर धक्कादायक सत्य आले समोर, मेंढपाळाने..

(Crime News): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. तरीही काही समस्या अशा आहेत ज्या अजूनही सुटलेल्या नाहीत. काही लोकांना मूलभूत गरजांसाठी सुद्धा संघर्ष करावा लागत आहे. कोणाला पाण्यासाठी तर कोणाला जेवणासाठी संघर्ष करावा लागतो. अशाच बाबतीत नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उभाडे येथील कातकरी वस्तीमधील तुळसाबाई सुरेश आगीवले यांनी तीन वर्षांपूर्वी आपली १० वर्षाची मुलगी गौरी हिला कामावर लावले होते. घरची परिस्थिती बिकट असल्याने संशयित आरोपी विकास सीताराम कुदनार याच्याकडे ती छोटी मुलगी काम करत होती. ती मेंढ्या चारण्याचे काम करायची. तिला तीन हजार रुपये मोबदला मिळत होता. विकास सीताराम कुदनार हे शिंदोडी येथील रहिवासी आहे.

काही दिवसांनी चांगले सांभाळत आहे असे दाखवून नंतर गौरीला प्रचंड मारहाण करून गळ्याला फास लावला. त्यांनतर बेशुद्ध अवस्थेत मागील महिन्यात २७ तारखेला मध्यरात्री गौरीला उभाडे येथील आगीवले कुटुंबीयांच्या राहत्या घराजवळ आणून टाकले. कुटुंबातील लोकांना याबाबत कोणतीही भनक लागू दिली नाही. विकास कुदनार व त्याच्या साथीदारांनी गौरीला तिथे टाकून दिले.

जाग आल्यावर आपल्या दारात कोण आहे हे पाहण्यासाठी काही वेळाने तुळसाबाई गेल्या असता त्यांना धक्का बसला. लाल चादरी मध्ये गुंडाळून बेशुद्ध अवस्थेत असलेली मुलगी गौरी असल्याचे समजताच त्यांनी हंबरडा फोडला. आवाज ऐकून वस्तीमधील काही कुटुंबातील सदस्य जागे झाले. त्यांनी तिला सिन्नर घोटी मार्गावरील वाहनामधून घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी ॲडमिट केले.

गौरीसोबत झालेली ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील आणखी ६ ते ७ मुले गायब असल्याचे समजले. गेल्या तीन वर्षापासून नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील मुलांना आई वडील वर्षाची तुटपुंजी रक्कम ५ ते १० हजार रुपये घेऊन हे काम करण्यासाठी पाठवत आहेत. या तिन्ही जिल्ह्यातील जवळपास ३० लहान मुलांना या कामासाठी एका एजेंटच्या साहाय्याने विक्री करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

नाशिक आणि नगर पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत आणि यात काही जणांना ताब्यात देखील घेतले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेत आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

पोलिसांना सखोल चौकशीचे आदेशही दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. अवघ्या सात दिवसांच्या उपचारादरम्यान गौरी हिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या
Rahul Gandhi: राहूल गांधींनी घातला ४१ हजाराचा टि शर्ट; भाजपने थेट पुरावाच दिला, केले गंभीर आरोप
Navneet Rana : पोलिसांवर बेफाम आरोप करणाऱ्या राणांना पोलिसाच्या पत्नीने झाप झाप झापले, थेट लायकीच काढली
Trinamool: ‘भारतातील सर्वात मोठे पप्पू अमित शहा आहेत’; पहा कुणी केलीय हे म्हणायची हिंमत
Nashik : गणपतीची मिरवणूक प्रचंड उत्साहात मशिदीजवळ आली अन् तेवढ्यात सुरू झाली अजान..; पुढे जे घडलं असं काही की…